आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

मनसेचा “माणुसकीचा फ्रिज” उपक्रम ठरतोय कौतुकाचा विषय

दिवाळीच्या पावन पर्वामध्ये कोणीही लहान मुले अथवा गरीब उपाशीपोटी झोपावे लागू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाण्यामध्ये एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.

“माणुसकीचा फ्रिज” असं या उपक्रमाचे नांव आहे. ठान्याचे मनसे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला ठाण्याच्या मनसे कार्यालयापासून सुरवात झाली आहे.

कोणालाही उपाशीपोटी झोपावे लागू नये या भावनेतून सुरु केलेल्या या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

माणुसकीचा फ्रिज

काय आहे माणुसकीचा फ्रिज संकल्पना?

मनसेच्या ठाणे कार्यालयाबाहेर एक फ्रिज ठेवण्यात आला आहे. ज्यात नागरिकांनी त्यांच्या घरातील अतिरिक्त फळे, ब्रेड, बिस्कीट किंवा अन्य कोणत्याही खाण्यायोग्य वस्तू आणून ठेवाव्यात. आणि जो भुकेला आहे त्याने त्या वस्तू खाण्यासाठी घेऊन जाव्या. अशी माणुसकीचे दर्शन घडवणारी संकल्पना या ठिकाणी मनसेकडून राबवण्यात आली आहे.

यातून फळे, बिस्कीट देणाऱ्या नागरिकांनाही आपल्या वस्तू खराब न होत्या कोणत्यातरी व्यक्तीची भूक भागवण्यासाठी कामी आल्याची समाधान मिळणार आहे तर दुसरीकडे गरीब भुकेल्या व्यक्तींची भूक सुद्धा भागणार आहे.

माणुसकीचा फ्रिज

परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त उपक्रमाला प्रतिसाद देऊन आपणही या पुण्याच्या कामात सहभागी व्हावे असं आव्हान ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जाधव यांनी केले होते.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवत भुकेल्यासाठी बिस्कीट, फळे, ब्रेड आणखी खाण्यायोग्य पदार्थ माणुसकीच्या फ्रिजमध्ये आणून ठेवण्यास सुरवात केली आहे.

वाढत्या प्रतिसादामुळे सध्या शहरात या उपक्रमाची जोरात चर्चा सुरु आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here