आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

या देशांमध्ये लागणार आहे फेसबुकवर बंदी, जाणून घ्या कोणत्या देशांमध्ये फेसबुक आता वापरू शकनार नाही.

जगप्रसिध्द सोशल मिडिया माध्यम फेसबुक काय आहे हे माहित नसणारा एकही व्यक्ती सापडणे आज अशक्यच वाटते. फेसबुकचा वापर देश विदेशातील आपल्या मित्रांसोबत बोलण्यासाठी, नवीन मित्र बनवण्यासोबतच आपल्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी केला जातो. आज फेसबुक हे देश विदेशातील आपल्या प्रियजणांशी बोलण्याचे माध्यम बनले आहे.

एका सर्वेनुसार फेसबुकचे जवळपास २.९ मिलियन active users आहेत, यांची संख्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये अधिकच वाढणार आहे हे मात्र नक्की आहे.

फेसबुक

फेसबुक हे खूप मोठे सोशल मिडिया प्लेटफॉर्म आहे, असे असूनही आपल्याला जाणून नक्कीच धक्का बसेल कि फेसबुकचा वापर करणे काही देशांमध्ये बेकायदेशीर आहे आणि त्या देशांनी यावर बंदी घातली आहे.

या देशांच्या यादीमध्ये आता सोलोमन द्वीपचे नाव सामील होणार आहे. सोलोमनची सरकार आजच्या दिवशी फेसबुक सारख्या लोकप्रिय आणि मोठ्या मिडिया माध्यमावर बंदी घालणार आहे आणि हि बंदी किती दिवस राहणार आहे याबद्दल काहीही ठराविक नाही.

सोलोमन येथून प्राप्त झालेल्या एका बातमीवरून, स्थानिक सरकारच्या विरोधात असलेली एक भडकाऊ पोस्ट आढळून आल्यामुळे त्यांनी फेसबुकवर सोलोमन देशामध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुक

सोलोमन द्वीप हा सुमारे ६.५ लाख लोकसंख्या असलेले बेत आहे. येथी सरकारच्या विरोधात एक पोस्ट समोर आली आहे. हि पोस्ट आल्याबरोबरच सोलोमन सरकारने एक मिटिंग बिलावली आहे, ज्यामध्ये फेसबुकवर बंदी लावण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. हि बातमी समोर येताच सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

फेसबुक बॅन झाल्याची हि पहिली घटना नाही, यापाहिले पण अनेक देशांनी फेसबुकवर बंदी घातली आहे. याठिकाणी फेसबुक वापरणे कायदेशीर गुन्हा आहे. असे असले तरीही तेथील लोक हे लोकप्रिय सोशल मिडिया माध्यम वापरत आहेत.

चीन मध्ये फेसबुक वापरावर संपूर्णतः बंदी आहे, तसेच नॉर्थ कोरिया आणि इराण सारख्या देशातही फेसबुक वापरावर बंदी आहे. या सर्व देशांच्या नंतर आता सोलोमन द्विपाचे नावही जोडले जाणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here