आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कॉफीच्या मदतीने मिळवा सुंदर आणि चमकणारा चेहरा.

 

सुंदर आणि चमकदार चेहरा हे आजच्या प्रत्येक युवतीचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकारण्यासाठी दर महिन्याला हजारो रुपये ब्युटी पार्लर मध्ये खर्च करण्यासाठी तयार असतात. एव्हढेच काय तर काही तरुणी तर चमकदार चेहरा मिळवण्यासाठी महागड्या ‘लेजर ट्रीटमेंटचा’ पण सहारा घेतात.

या सर्व उपायांनी चेहरा तर सुंदर होऊ शकतो पण यासोबत भयंकर साइड इफेक्टचा धोका पण उद्भवू शकतो.

चेहरा

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असा सिक्रेट उपाय ज्यामुळे आपला चेहरा पण सुंदर दिसतो तेही अगदी कमी खर्चामध्ये आणि कोणतेही साइड इफेक्ट न होता. या सिक्रेट मध्ये कॉफीचा उपयोग होतो. चला तर जाणून घेवूया कॉफीमध्ये लपलेल्या ब्युटी सिक्रेट बद्दल..

मूड फ्रेश करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी आपण कडक कॉफीचा उपयोग करतो, परंतु तुम्हाला माहित आहे का? हीच कॉफी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेमंद आहे. चेहऱ्यावर कॉफीचा उपयोग केला तर , तुम्हाला पार्लरमधल्या
महागड्या फेसिअल ची पण गरज भासणार नाही.

 

कॉफीमध्ये अनेक एंटी एजिंग एजेंट असतात. यामुळेच नियमित कॉफीचा वापर केल्याने तुमची त्वचा सुंदर आणि वय कमी दिसते.

चेहरा

कॉफीचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया…

चेहऱ्यावर निखार आणण्यासाठी कॉफी खूप फायदेमंद आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि याचा काहीही साइड इफेक्ट होत नाही. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरच्या डाग धब्ब्यांपासून सुटकारा मिळतो. कॉफीमुळे तुमचा चेहरा निखरतो सोबतच चेहऱ्यावरची मृत त्वचा काढून टाकण्यास देखील कॉफी खूप प्रभावी आहे.

 

कॉफीपासून स्क्रब बनवण्याची विधी..

 

एक लहान वाटी घेवून त्यामध्ये एक छोटा चमचा कॉफी पावडर घ्या.

 

आता या कॉफी पावडरमध्ये एक लहान चमचा तांदळाचे पीठ घ्या. (तांदळाचे पीठ तुम्ही कोणत्याही जेनरल स्टोअर मध्ये मिळू शकतो किंवा घराच्या घरी पण आपण तांदूळ वाटून त्याचे पीठ करू शकता.)

 

या तयार मिश्रणामध्ये दोन छोटे चमचे कच्चे दुध आणि एक छोटा चमचा लिंबाचा रस तासेच्क एक छोटा चमचा मध टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्या.

 

हि पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्यावर आणि मानेवर लावून व्यवस्तीत चोळा.

 

चेहऱ्यावर १०-१५ मिनिट चोळत मसाज केल्यावर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा.

आठवड्यात चार दिवस या फेस पॅकचा उपयोग केल्याने तुमचा चेहरा हा  चमकदार दिसू लागेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here