आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

यावर्षी दिवाळीची आतिषबाजी ६८0 लाख  लोकांच्या जीवावर बेतली..!

 

केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारांनी मनाई करूनही दिल्ली आणि आजूबाजूच्या मोठ मोठ्या इमारतीत राहणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी यावर्षी दिवाळीला अतिशय जास्त प्रमाणात फटाके फोडून संपूर्ण परिसर विषारी बनवून टाकला आहे.

आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल कि, ४ वर्ष जुना रेकॉर्ड यावर्षी तुटला आहे. दिवाळीच्या रात्री दिल्लीतील काही ठिकाणी हवेची गुणवत्ता म्हणजेच एयर क्वालिटी इंडेक्स ९०० च्या पार पोहचली होती.

मागील एक महिन्यापासून एनजीपी आणि सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा विषारी आणि प्रदूषित हवेपासून बचावासाठी अनेक मार्गदर्शक सूचना आणि आदेश काढल्या जात होते. आतिषबाजी करू नये अशा अनेक जाहिराती पण केल्या जात होत्या.

इतकेच काय तर असे दावेही केले गेले की यावर्षी फटाके विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. परंतु संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये ह्या कायद्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले होते.

दिवाळी

आतिषबाजीमुळे आरोग्यासह आर्थिक समस्या होण्याचीही शक्यता…

आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय भारतासाठी अत्यंत गंभीर विषय आहे, कारण आपल्या देशाचुं राजधानीतील हवा अत्यंत विषारी आहे. यामुळे याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक कंपन्या गुंतवणूक करणार नाही. AQI ५०० होण्याचा
अर्थ आहे कि इथली हवा हि मानवांसाठी श्वास घेण्याच्या लायकीची राहिलीच नाही.

जो समाज शेतकऱ्यांच्या शेतात जाळल्या जाणार्या कचऱ्याला वायू प्रदुषणासाठी जबाबदार मनात होता त्याच समाजाने कोरोनावायरस बेरोजगारी व मंदीचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांना दाव्यांप्रमाणे चिरडून टाकले, हि अत्यंत गंभीर बाब आहे.
यासोबतच हवेतील विषारी घटकांचा स्तर झपाट्याने वाढवला.

 

दिवसेंदिवस आटोक्याच्या बाहेर जात आहे वायू प्रदूषण..

दिवाळी

 

दिवाळीमध्ये फोडण्यात आलेल्या फटक्यांपासून निघालेल्या करोडो टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे हि देखील खूप मोठी समस्या बनली आहे. जर या कचर्याला जाळण्यात आले तर भयंकर वायू प्रदूषण होणार आणि ह्या कागदांना रिसायकल
जरी केले तरीही त्यातील विषारी घटक हे आपल्या घरात आणि परिसरामध्ये परत येतील. जर हा कचरा डम्पिंग मैदानात असाच राही दिला तर त्याचे लहान लहान विषारी कान हे मातीमध्ये सामावून जमिनीलाही विषारी बनवून टाकतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

INTERESTING FOR YOU.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here