आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

लव्ह जिहाद विरोधात लवकरच येणार नवीन कायदा..!

मध्यप्रदेशातील शिवराज सरकार पुढील विधानसभा अधिवेशनात लव्ह जिहादविरूद्ध एक नवे विधेयक आणणार आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याविषयी माहिती दिली आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले, लव्ह जिहादमध्ये ५ वर्षांच्या कठोर कारावासाची तरतूद असेल आणि आरोपीविरुद्ध अजामीनपात्र कलमांन्वये गुन्हा दाखल केला जाईल.

तसेच आरोपीला मदत करणारा सहयोगी देखील मुख्य आरोपींसारखाच गुन्हेगार असेल. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, जर कोणी लग्नासाठी स्वेच्छेने धर्मांतरित झाले तर त्याला महिन्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे बंधनकारक असेल.

लव्ह जिहाद प्रकरणांकडे अति गंभीरतेने पाहणार: शिवराज सिंह

लव्ह जिहाद
लव्ह जिहाद

यापाहिले पण मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी लव्ह जिहाद विरोधात मोठे बयान दिले आहे. त्यासोबतच त्यांनी हे साफ केले आहे, मध्यप्रदेशात अशा प्रकरणांना अति गंभीरतेने घेतले जाणार आहे आणि लवकरच मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याच्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत हा निर्णय घेतला होता.

लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा योगी आदित्यनाथ यांच्याकडून मागवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या लव्ह जिहादवर कायदा लागू करण्याच्या घोषणेनंतर मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर यांनी या दिशेने एक पाऊल पुढे टाकत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा मागितला आहे.

स्पीकर रामेश्वर मिश्र यांच्या मते, नाव बदलून मुलीची ज्या प्रकारे फसवणूक केली जाते आणि त्यानंतर तिच्याबरोबर जे काही घडते, त्यासाठी देशभरात तसा कायदा होणे आवश्यकच आहे.

लव्ह जिहाद पासून मुलींचे रक्षण करणे हे देखील कर्तव्य आहे – रामेश्वर शर्मा

लव्ह जिहाद
लव्ह जिहाद

याविषयावर अधिक प्रकाश टाकताना रामेश्वर मिश्र म्हणतात, मागील काही प्रकरणांमध्ये असे पाहण्यात आले आहे कि, एका राज्यात कायदेशीर अलग कारवाही होते तर दुसऱ्या राज्यात अलगच. यामुळे आम्ही उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे कारण दोन्ही राज्यात एकसारखाच आणि कठोर कायदा अस्तित्वात यावा.

एका प्रसार माध्यमाने प्रोमेत स्पीकर यांना विचारले, संविधानिक पदावर असताना तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता तेंव्हा त्यांनी  प्रतीउत्तर दिले

“लव्ह जिहाद पासून मुलींचे रक्षण करणे हे देखील आमचे कर्तव्य आहे जे कि संविधानाने दिले आहे “

दुसरीकडे नरोत्तम मिश्रा यांनी विधानसभेत लव्ह जिहादवर बयान देत हे स्पष्ट केले आहे की मध्य प्रदेशचे शिवराज सरकार लव्ह जिहादसंदर्भात कठोर कायदा करणार आहे. सरकार कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेऊन समाजातील सर्व घटकांशी याबद्दल चर्चा करीत आहे आणि याबद्दल लवकरच सर्वांना कळवले जाईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

INTERESTING FOR YOU.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here