आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

करोडो रुपयाच्या अपहार प्रकरणी भाजपच्या या मोठ्या नेत्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल.

औरंगाबाद येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी १६ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

(case registered against 16 people including BJP MLA prashant bamb for embezzing Rs 1575 crore)

या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्रशांत बंब यांनी बनवत कागदपत्रे तयार करून कारखान्याच्या सभासदांची फसवणूक करत १५ कोटी ७५ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

भाजप

यानंतर सभासदांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत आपली तपास चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.

गंगापूर साखर कारखान्यात पैशांचा अपहार?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. हे पैसे परत कारखान्याच्या खात्यावर आले तेंव्हा हि रक्कम सुमारे १५ कोटी ७५ लाख होती. परंतु खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही,

असं कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळेच सर्व सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

भाजप

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांनी डीआरडी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. परंतु काही कालांतराने विक्रीची व्यवहार रद्द झाला म्हणून कोर्टाकडून हि सर्व रक्कम कारखान्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली.

यावर प्रशांत बंब यांनी आपली वेगळी भूमिका घेत ह्या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. या संपूर्ण प्रकरणात १४ सभासदांनीही  फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

आता हे सर्व प्रकरण पोलीस अधिकारी तपासत आहेत. आणि आता आमदार प्रशांत बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलिसांकडून योग्य न्याय मिळाला नाही तर पुढील कायदेशीर कार्यवाही करू असही यावेळी सभासदांकडून म्हणण्यात आले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here