आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दह्यासोबत कधीच खाऊ नका या गोष्टी, नाहीतर होतील गंभीर परिणाम .

आपल्याला माहित असेल कि हिंदू धर्माच्या अनुसार दही खूप शुभ मानले जाते. आपण बर्‍याचदा पाहिले असेल की जेव्हा जेव्हा कोणी एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर पडतो तेव्हा त्याला दही खायला दिले जाते. यामागे असा विश्वास आहे की दही खाणे आणि शुभ कार्यासाठी बाहेर पडणे, याने आपले निश्चितपणे कार्य पूर्ण होते.

तसेच दही आपली रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते. बरं, पण आपण दही अनेक प्रकारे खातो. काहीजण साखर मिसळून खातात तर काही जण त्यामध्ये मीठ टाकून खातात प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने दही खात असतो.

परिणाम

आपणास सांगू इच्छितो की दहीमध्ये लैक्टिक एसिड असते जे आपल्या पोटात चांगले बॅक्टेरिया बनवते आणि आपली पाचक प्रणाली मजबूत करते. त्याच वेळी, अशा काही गोष्टी आहेत जा दही सोबत खाल्ल्यास, अनेक रोगांना आमंत्रण मिळते.

चला तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या दह्यासोबत खाऊ नयेत हे आज जाणून घेऊ.

 

दही आणि मासे. 

आपण कधीही चुकून सुद्धा दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. कारण या दोघांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणत असतात आणि दोन प्रकारचे प्रथिने स्त्रोत एकत्र सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. तसेच दुसरे कारण म्हणजे दही हे गाईच्या दुधापासून बनवले जाते, तर मासे हे नॉनव्हेज असतात, म्हणून हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्यास आपल्याला पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

 

कांदा आणि दही. 

कांदा आणि दही कधीही एकत्र खाऊ नयेत. आपण पहिले असेल की लोक बर्‍याचदा दह्यामध्ये कांदा मिसळून खातात. पण असे करणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे कारण दही थंड असते तर कांदा हा उष्ण असतो, म्हणून ते एकत्र खाल्ल्याने आपल्याला एलर्जी सारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

 

दूध आणि दही.

जर आपण दूध आणि दही एकत्र खाल्ले तर आपल्याला अ‍ॅसिडिटी आणि गॅस सारखे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून आपण कधीही दूध आणि दही एकत्र खाऊ नये.

परिणाम

दही आणि आंबा.

आंब्यासोबत दही खाणे अनेक जणांना स्वादिष्ट वाटेल पण ते आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरात त्वचेशी संबंधित बर्‍याच समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे कधीही या दोन गोष्टी एकत्र खाऊ नयेत.

 

दही आणि पराठा.

दही आणि पराठा हा बर्‍याच लोकांचा आवडता नाश्ता आहे, परंतु तेलकट पदार्थ आणि दही एकत्र खाण्याने आपल्या शरीराला खूप नुकसान होते. जर आपण दररोज दही आणि पराठे एकत्र खाल्ले तर आपले वजन झटक्यात वाढते शिवाय आपल्याला आळस देखील भरपूर प्रमाणात येईल.

 

उडीद डाळ आणि दही. 

आयुर्वेद उडीद डाळ आणि दही एकत्र खाण्यास स्पष्टपणे मनाई करते. जर आपण उडीद डाळीपासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टी सोबत दही खाल्ले तर आपल्याला बराच काळ पोटाशी संबंधित अनेक आजार असतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here