आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अबब…या शहरात आता २०२१ मध्येच होणार सकाळ, शहर बनतंय चर्चेचा विषय…

जगात अशे अनेक ठिकाण आहेत जे त्यांच्या विशेषतः मुळे चर्चेत राहतात. जसे कि डेड सी ज्यामध्ये कोणतीही वस्तू बुडत नाही. अमेरिकामध्ये असेच एक ठिकाण आहे ज्याचे नाव आहे, अलास्का.

अलास्का हे अतिशय सुन्दर ठिकाण आहे. सुंदरते शिवाय हि जागा आपले शहर उतकियागविक यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली असते.

वास्तविकता उतकियागविक या शहरात २ महिने लगातार सूर्य उगवलेला असतो, आणि यानंतर २ महिने रात्र राहते. पृथ्वीवर बाकी सर्व ठिकाणी दिवस आणि रात्र बरी बरीने होत असतात असे या ठिकाणी होत नाही.

१८ नोव्हेंबर रोजी या शहरात लोकांनी शेवटचा सूर्य पहिला, आता २ महिने आणि ५ दिवसांच्या नंतरच  त्यांना परत सूर्योदय दिसणार आहे. चला तर जाणून घेऊया उतकियागविकमध्ये असे अजीब प्रकार नेमके कशामुळे होतात याबद्दल…

आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी आपल्या अक्षांवर फिरते आणि तिला संपूर्ण फेरी करण्यासाठी २४ तास लागतात. यामध्ये १२ तास पृथ्वीच्या एका बाजूला सूर्यप्रकाश पडतो तर दुसऱ्या भागावर अंधकार असतो, म्हणजे तिथे रात्र असते.

पृथ्वी स्वताभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते, यासाठी पृथ्वीला ३६५ दिवस, ६ तास, ४८ मिनिट लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो. या एका वर्षात १२ महिने असतात जेअलग अलग ऋतूंच्या सोबत संपतात.

पृथ्वी हि तिच्या अक्षावर वाकलेली असते. तामुळे तिचे दोन्हीही ध्रुव उत्तर आणि दक्षिण यांच्यावर एकत्र सूर्यप्रकाश पडत नाही. हेच कारण आहे ज्यामुळे उत्तरेला जर ६ महिन्याची रात्र असेल तर दक्षिणेला ६ महिने दिवसच राहतो.

 

 

उत्तर ध्रुवाला आर्कटिक सर्कल म्हणतात तर दक्षिण ध्रुवाला अंटार्कटिक सर्कल म्हणतात. अलास्काचे उतकियागविक हे शहर आर्कटिक सर्कल मध्ये येते. शिवाय हे शहर बाकी ठिकाणांहून जास्त उंचावर स्थित आहे.

यामुळे आता १८ नोव्हेंबर नंतर या शहरावर सूर्याचा प्रकाश पडणार नाही. या ठिकाणी सूर्य तर उगवतो परंतु, येणारे ६५ दिवस याठिकाणी सूर्याचा प्रकाश पडणार नाही.

 

शहर

 

नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत या ठिकाणी कडाक्याची थंडी राहते, इथले तापमान मायनस २३ डिग्री इतके खालावते, यासोबतच याठीकानाची विजिबलिटी पण फारच कमी होते. यामुळे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहचू शकत नाहीत.

याठिकाणी रात्र तर ६५ दिवसच राहते याउलट दिवस(सूर्योदय) हे ८२ दिवस सतत. याठिकाणीही सूर्यास्त होतो परंतु, हे शहर उचावर असल्यामुळे इथे सूर्याचा प्रकाश राहतो आणिदिवस असल्याचा भास होतो.

उतकियागविक मध्ये १२ मे पासून २ ऑगस्ट पर्यंत सलग दिवसच होता.

आता १८ नोव्हेंबरला इथल्या लोकांनी सूर्याचे अंतिम दर्शन घेतले आहे. यानंतर त्यांना पुढच्या वस्र्शीच सूर देवाचे दर्शन होणार आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here