आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपण या 6 सवयी बदलल्या तर हिवाळ्यात आपले आरोग्य निरोगी राहील ..

 

यावर्षी हिवाळा जरा कडाक्याचाच होणार असे दिसत आहे, आणि याची प्रचीती आपणास येताच असेल. बदलत्या हवामानामुळे थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या बदलामुळे आरोग्यास अनेक अडचणी येतात.
हिवाळ्यात रोग हे अन्य ऋतूंपेक्षा जास्तच वेगाने पसरतात. अशा परिस्थितीत रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास समस्या आणखी वाढू शकते. म्हणूनच, हिवाळ्याच्या काळात आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

 

new google

आरोग्य

 

हिवाळ्यात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत, काही खबरदारी घेतल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केल्यास आपले आरोग्य निरोगी ठेवता येते. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हिवाळ्यात आपल्या आरोग्याच्या दृष्ठीने महत्वाच्या गोष्ठी.

 

हिवाळ्यात आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स.

 

१) रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल वर नियंत्रित मिळवा.

आरोग्य

कोणत्याही आजाराची सुरुवात हि ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रॉल वाढल्यानेच होते म्हणून हिवाळ्यात तर या दोन्हींची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. या कालावधीत साखर तसेच मिठाचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात करावे कारण यामुळे ह्र्द्यरोगाचा धोका उद्भवू शकतो.

 

२) खान-पानातील वाईट सवयी सोडा.

संपूर्ण धान्य, डाळ इत्यादी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. तळलेले आणि सैचुरेटेड पदार्थांचे सेवन करू नका तसेच भरपूर फळे आणि भाज्या खा. या हंगामात रोगांविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यात असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप फायदेशीर ठरतात. या लहान सहन सवयी सोडल्यास आपनास निरोगी राहण्यास अवश्य मदत मिळेल.

 

३) भरपूर पाणी प्या.

हिवाळ्यात आपण तहान लागत नाही म्हणून जास्त पाणी पीत नाही, परंतु हि गोष्ट फार हानिकारक आहे. हिवाळ्यात तर आपण जास्तीत जास्त पाणी प्यावे. हर्बल टी, ग्रीन टी यांच्या सेवनाने एलडीएल कॉलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइडची पातळी खालावते. हि लहानशी सवय बाळगून
आपण आपल्या आरोग्याचा फार मोठा फायदा करून घेऊ शकता.

४) शरीराच्या वाढत्या वजनावर मिळावा ताबा.

आरोग्य

हिवाळ्यामध्ये आपले वजन नियंत्रित करा, तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा दररोज चालत फिरा हा चांगला व्यायाम आहे. तसेच चालण्यामुळे शरीरात उष्णता येते. दिवसाला ६-८ तास झोप घ्या. दररोज किमान १५ मिनिटे चाला यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि बऱ्याच समस्या दूर राहतात. हिवाळा हा व्यायामासाठी विशेष ऋतू मानल्या जातो याचा पुरेपूर फायदा घ्या.

५) व्यसनांपासून दूर राहा.

हृदयाच्या रोगांना आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर, धुम्रपान आणि दारू यांचे सेवन अजिबात करू नका.

 

६) स्वताला नेहमी( उष्ण) गरम ठेवा.

हिवाळ्यामध्ये नेहमी उबदार कपडे वापरावे यामुळे आपल्या शरीराचे तापमान उबदार राहते. विशेषतः पाय, डोके आणि कान झाकून ठेवावेत.

या सवयी जर बाळगल्या तर नक्कीच या हिवाळ्यामध्ये आपले आरोग्य सदृढ राहील.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :  ५०० पेक्षाही जास्त मानवी सांगाडे सापडलेला रूपकुंड तलाव…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here