आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
हिऱ्यांपेक्षाही महाग विकल्या गेलयं हे कबुतर, वाचा का वाढतेय याची किंमत…
जगामध्ये अनेक प्रकारचे पाळीव पक्षी आणि प्राणी आहेत त्यांच्या किमतीही लाखो करोडो रुपये असतात, परंतु एखादे कबुतर करोडो रुपयांमध्ये विकले जाऊ शकते का? कदाचित या गोष्ठीवर कोणालाही विश्वास होणार नाही.
असे असले तरीही हे सत्य आहे, बेल्जियममध्ये एका लिलावात या कबुतराला १४ करोड पेक्षा जास्त महागात विकले गेले आहे, तेंव्हापासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा चालू आहे.

या घटनेवरून हे स्पष्ठ झाले आहे कि, एकेकाळी पत्रांची देवाण-घेवाण करणारा आणि कधीकाळी बॉलीवूडच्या गाण्यांमधील मुख्य भूमिका असणारा पक्षी आता जगभरात प्रसिध्द झाला आहे. या अहवालानुसार बेल्जियमच्या एका रेसर कबुतराला रेकॉर्ड तोड १९ लाख डॉलर्स मध्ये विकले आहे.
२ वर्ष वय असणाऱ्या या मादा कबुतरीचे नाव आहे न्यू किम. लिलावात या कबुतरीची सुरुवाती किमत २३७ डॉलर्स एव्हढी ठेवण्यात आली होती परंतु चीनच्या एका व्यक्तीने या कबुतरीला १९ लाख डॉलर्स मध्ये खरेदी करून एक नवा विक्रम बनवला आहे.

आपल्या शहरांमध्ये उंच उंच इमारतीवर गुटर-गु करणारे कबुतर फारच कमी लोकांना आवडतात, तुम्ही कधी विचार केला होता कि, प्रत्येक ठिकाणी घान करणारे कबुतर करोडो रुपयांमध्ये विकले जाऊ शकते?
या लकी कबुतराला (१४ करोड १५ लाख रुपयांपेक्षा जास्त) रुपयांनी खरेदी केले आहे चीनच्या एका पक्षीप्रेमी व्यक्तीने.
(NEW KIM) नावाच्या या कबुतराने २०१८ मध्ये फ्रान्सच्या एका रेसमध्ये भाग घेतला होता आणि ते विजयीही झाले होते. या नंतरच कबुतराची किमत करोडोंमध्ये लावल्या जात होती.
२०१८ च्या रेसनंतर न्यू किम रिटायर्ड झाली होती. साधारणतः नर कबुतराची किंमत हि जास्त असते परंतु या घटनेत मादा कबुतराने सर्वांना पछाडले आहे.

या लिलावात एकून ४४५ पक्षांची नीलामी करण्यात आली होती. चीनच्या लोकांना कबुतरांच्या रेसचे फार मोठे वेड आहे, चीनमध्ये हा खेळ हजारो वर्षांपासून खेळला जात आहे. म्हणूनच याठिकाणी अनेक लोक महागडे कबुतर घेऊन भाग घेण्यासाठी येतात.
हे कबुतर अतिशय वेगाने उडतात. यांचे वय १३-१५ वर्ष असते.कबुतरांची रेस हि घोड्यांच्या रेसप्रमाणेच आयोजित केल्या जाते, महत्वाचे म्हणजे या रेसवर करोडो रुपयांचा सट्टा लावल्या जातो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.