आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अनेक शिक्षक कोरोणा बाधित असताना शाळा उघडणे कितपत योग्य?

सोमवार पासून म्हणजेच २३ नोव्हेंबर पासून राज्यातील मुंबई आणि ठाणे वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत. सरकार आणि प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर अनेकजन्नांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे, शाळा सुरु करण्यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक शिक्षकांच्या तपासणीमध्ये त्यांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रश्न सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्याविचारात आहे कि, अनेक शिक्षक कोरोणा बाधित असताना शाळा उघडणे कितपत योग्य?

शिक्षक

new google

मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा ह्या ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेत सरकारने २३ तारखीपासून नववी आणि बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा पहिलाच आदेश पाळत सर्व शिक्षक आणि शालेय कर्मचारी वर्गाची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयान्वये सर्व शिक्षक आणि कर्मचार्यांची कोविड RT-PCR चाचणी केली जात आहे आणि यामध्ये अनेक जन पॉझिटिव्ह आढळत आहेत हि एक धक्कादायक बाब आहे.

या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त शिक्षक पॉझिटिव्ह!

शिक्षक

उस्मानाबादेत झालेल्या चाचणीमध्ये ४८ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर नांदेड जिल्ह्यातील एकाच शाळेतील ११ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. याव्यतिरिक्त औरंगाबाद येथील १५ शिक्षक आणि कर्मचारी या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यातील २५ शिक्षकही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल समोर आला आहे.

या परिस्थितीमध्ये शिक्षकच कोरोणा पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. या सर्व घटनांमुळे शाळा कशाप्रकारे सुरु करायच्या याबद्दल प्रशासनामध्ये संभ्रम पाहायला मिळत आहेत.

अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेमुळे मुंबईप्रमाणेच अनेक प्रशासन शाळा बंद ठेवतील असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

शाळा सुरु करण्याचा निर्णयाला स्थगिती: मराठवाडा शिक्षक संघ.

शिक्षक

२३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. सरकारने शाळा सुरु करून विनाकारण कोरोनाला निमंत्रण देऊ नये, तसेच शाळा सुरु झाल्या तरीही पालक आपल्या पाल्यांना या स्थितीत शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षण सुरु ठेवावे हि मागणी आता जोर धरताना दिसून येत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here