आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

राजकीय फायद्यासाठी गलिच्छ राजकारण…

मुंबई मनपावर आपला भगवा फडकावण्यासाठी भाजप कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार गर्दी न करण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले असताना, महाराष्ट्रातील काही भाजप नेते यावर सरळ दुर्लक्ष करत रस्त्यावर उतरत आहेत आणि यामुळेच आपण कोरोनाचा प्रसार वाढवत जनतेच्या जीवांशी खेळत आहोत असा खडेबोल शिवसेनेने भाजपला सुनावले आहेत.

शिवसेनेचे मुखपृष्ठ असणाऱ्या दैनिक सामनाच्या एका लेखातून, वाढीव वीज बिलाच्या नावावर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारले आहे.

राजकारण

एकीकडे पंतप्रधान मोदी हे G-२० संमेलनात बोलतात कि, कोरोणा हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट आहे, मानवतेसाठी हा काळ परीक्षेचा आहे. आपल्या सर्वांना एकत्र येवून या संकटाचा सामना करावा लागणार आहे, (हे सर्व त्यांनी जागतिक नेत्यांना संबोधताना काढलेले उद्गार आहेत.)

परंतु आपल्या देशाच्या बाबतीत मात्र “दिव्याखाली अंधार” यासारखीच गत झाली आहे. कारण भाजप नेत्यांनी या महामारीच्या काळाला आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरायचे हे पक्के ठरवलेले दिसतेय. यामुळेच शिवसेनेने महामारीचे बाप बनून लोकांना धोक्यात का ढकलता? असा जाब विचारला आहे.

मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी वाढीव वीजबिलाच्या नावावर आंदोलने केली. यामध्ये त्यांनी गर्दी, जमाव, सोशल डिस्टन्सिंग, यांचे काहीही एक भान ठेवले नाही. विरोधी पक्षाचे स्थान आपल्या लोकशाहीत सरकार एव्हढेच महत्वाचे आहे.

परंतु अशा महाबिकट काळात केवळ सत्तेसाठी नीच राजकारण करणे हे एका जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. राजकीय फायद्यासाठी करण्यात येणाऱ्या गोंधळामुळे कोरोणा परत आपली पायमुळे पसरवत आहे याकडे आपल दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.

राजकारण

एकीकडे आपणच, हे सरकार कोरोनाशी लढण्यास असमर्थ आहे अशी तुतारी वाजवायची आणि दुसरीकडे सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांवर पाणी टाकत अशी आंदोलने करत कोरोनाचा प्रसार वाढवायचा हि नितीमत्ता आता भाजपची दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार असे भाजपला वाटत आहे आणि त्याचाच फायदा घेत आपण मनपावर आपला झेंडा फडकायचा असे स्वप्न आता भाजप बघत आहे. यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेने टोला लगावत,

 

“तुमचे गलिच्छ राजकारण तुमच्यापाशीच ठेवा, पण त्यासाठी मायबाप जनतेला या महामारीच्या विळख्यात देऊ नका. असे म्हटले आहे.”

 

राजकारण

कोरोनाचा प्रसार आता परत तेज होताना दिसत आहे आणि हि सर्वांसाठीच धोक्याची घंटी आहे. दिल्लीची परिस्थिती कशी हाताबाहेर जात आहे हे आपण बघतच आहोत. दिल्ली हे केवळ केजरीवाल यांचेच राज्य नसून संपूर्ण देशाची राजधानी आहे त्यामुळे दिल्लीला सर्वोतपरी मदत करणे हे केंद्र सरकारचे पहिले कर्तव्य आहे.

कोरोनाने कोणालाही सोडले नाही, भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनाही त्याची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडिया तर कोरोनाचे बळीच ठरले. अनेक खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही शिवसेनेने भाजप सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रातील काही नेते म्हणतात कि, शिवसेनेने केवळ हात धुवा, आणि मास्क लावा हे सांगण्या पलीकडे काहीच केले नाही. यावर सेनेने प्रतिउत्तर देताना ” लोकं आता मास्क लावतात, हात धुतात तुम्हाला हे जमत नसेल तर लोकांची शिस्त का बिगाडता? असा टोला लगावला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here