आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

स्वामींनी सांगलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या.!


 

स्वामी समर्थ सांगतात आपल्या जीवनात लहान सहान गोष्टी घडत असतात. स्वामींनी आपल्याला त्यांच्या जीवनातील अनुभववावरून अनेक आशा काही गोष्टी सांगीतल्या आहेत.त्यांचे अनुकरण करून आपण किती तरी अडचणी आणि संकटापासून दूर राहू शकतो.

 

स्वामीनी आपल्याला उपदेश देतांना काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचा उल्लेख इतरांना समोर करू नये असे स्वामी सांगतात.त्या गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात असे स्वामी सांगतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया.

स्वामी समर्थ

१) अपमान.

आपल्या जीवनात काही काही गोष्टी अशा घडतात की आपण इतरांच्या चेष्टेचा विषय बनतो. सर्वजण आपली चेष्टा करतात आपला अपमान करतात.

स्वामी म्हणतात असा अपमानाचा गोष्टी इतरांना सांगू नयेत कारण त्यामुळे आपण आपला आपमान इतरांना सांगून पुन्हा अपमानच मिळवतो.आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टी इतरांना सांगाव्यात.

त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील वाईट गोष्टी ,घटना,आपमानातील प्रसंग इतरांना सांगू नये.

स्वामी सांगतात आपले दुःख ,त्रास,वैयक्तिक अडचणी, कुटुंबातील समस्या इतरांनसमोर मांडू नयेत कारण आपला त्रास कमी होण्याऐवजी तो वाढतो आपण इतरांना विश्वासाने आपले दुःख सांगतो.

त्या व्यक्ती आपले दुःख रडून ऐकतात व इतरांना सांगताना हसून आपले दुःख त्रास सांगतात म्हणजेच आपल्यासमोर ते आपल्या समोर आपल्या दुःखात सामील आहेत असे दाखवतात पण इतरांना आपले दुःख ,त्रास,वेदना,हसून सांगतात म्हणून आपले दुःख ,त्रास,वेदना आपल्या विश्वासू व्यक्तीला किंवा आपल्या पत्नीला सांगावे.

स्वामी समर्थ

२.धनसंपत्ती नुकसान.

 

कधी कधी आपल्या जीवनात आपल्याला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते की आपन जीवनभर कष्ट करून मिळवलेले धन आपण गमावून बसतो अशा वेळी आपले मानसिक संतुलन ढासळते आपण आपले धैर्य गमावून बसतो अशी परस्थिती आल्यास इतरांना ही गोष्ट सांगू नये कारण आपल्याला गरिबी,दारिद्र्य आल्या स ते आपल्याला तातपुरता धैर्य देतात.

 

कुणीही आपल्याला मदत करत नाहीत तर अशा वेळी ते आपल्यापासून दूर निघून जातात.कारण आजकालच्या जीवनात तुमचा जवळ पैसा असेल तर सर्व आपल्या जवळ येतात.

अशा वेळी त्या परिस्थितीतुन बाहेर कसे पडावे याचा विचार करावा पण आपली गरिबी इतरांना सांगू नये.

स्वामी सांगतात आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर झालेली धनहानी आपण परत मिळऊ शकतो जीवनामध्ये चढ उतार येतच असतात पण या सर्वांना चर्चेचा विषय न बनवता त्यातून चांगला व हिताचा मार्ग काढणे गरजेचे आहे.

हेच स्वामीनी सांगितले आहे .श्री स्वामी समर्थ.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here