आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

पोलिसांनी चक्क केली ३ वर्षांच्या कुत्र्यची डीएनए चाचणी.. प्रकरण जाणून आच्छर्य वाटेल.

 

मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात पोलिसांनी एक प्रकरण उघडकीस आणण्यासाठी चक्क एका तीन वर्षाच्या कुत्र्याची डीएनए चाचणी घेतली आहे. वस्तुतः होशंगाबाद जिल्ह्यातील दोन जणांनी लॅब्राडोर कुत्र्यावर आपला मालकी हक्क सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या लॅब्राडोर कुत्र्याचा डीएनए घेण्याचा निर्णय घेतला.

 

new google

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लॅब्राडोर कुत्र्याच्या मालकीवरून दोन व्यक्ती समोरासमोर आले होते. होशंगाबाद येथील रहिवासी असणाऱ्या शादाब खान यांनी ऑगस्ट २०२० मध्ये पोलिसात गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा 3 वर्षांचा लाब्राडोर कुत्रे बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले.

 

पण अलीकडेच शादाब खानला त्याच्या कुत्र्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली. यानंतर शादाब खानने पोलिसांना ही माहिती दिली आणि त्यांचा कुत्रा मलाखेडी परिसरातील कृतिक शिवहरे यांच्या घरात असल्याचे सांगितले. या घरात जाऊन शादाबने त्याच्या कुत्र्याला त्याच्याकडून परत घेण्याचा प्रयत्न केला. पण कृतिक शिवहरे या व्यक्तीने हा कुत्रा परत देण्यास नकार दिला आणि म्हटले की तो त्याचा कुत्रा आहे आणि त्याचे नाव टायगर आहे.

 डीएनए चाचणी

 

कृतिक शिवहरे आणि शादाब यांच्यात त्या कुत्र्याच्या हक्काबाबत वाद झाला. जेव्हा हा प्रश्न सुटला नाही, तेव्हा शादाबने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना काही छायाचित्रे आणि कागदपत्रे दाखविली. या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते कृतिक यांनीही पोलिस स्टेशन गाठले आणि त्यांनी आपला दावाही सादर केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण सोडविण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याचे ठरविले.

डीएनए चाचणी

 

खटला सोडविण्यासाठी पोलिसांनी त्या कुत्र्याची मदत देखील घेतली. पण कुत्र्याला त्याच्या हक्काचा मालक ओळखता आला नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी त्या कुत्र्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कुत्र्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. होशंगाबाद ग्रामीण भागातील स्टेशन प्रभारी हेमंत श्रीवास्तव म्हणतात की डीएनएच्या अहवालानंतर हे कुत्रे मूळ मालकाकडे देण्यात येईल. पण अद्याप या कुत्र्याचा डीएनए अहवाल आला नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here