आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

‘सुहागरात’च्या रात्री दुध का पितात? जाणून घ्या खरे कारण…

सध्या सर्वत्र लग्नाच्या तयाऱ्या चालू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी अनेक लग्न टाळल्या गेले आहेत. परंतु काही लोकांनी शासनाने सांगलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आपापले लग्नकार्य संपन्न करून घेतले आहेत.

सुहागरात
सुहागरात

लग्नामध्ये अनेक प्रकारचे रिती, रिवाज पार पडल्या जातात, प्रत्येक रिवाजाचे आपले महत्व असते. भारतीय लग्न कार्यक्रमात ‘सुहागरात’ हे शेवटचे चरण मानले जाते. लग्नातील प्रत्येक रीवाज पार पडल्यावर या चरणात पती पत्नी आपल्या नवीन व्यवहायिक जीवनात प्रवेश करतात. ‘सुहागरात’ला नवरदेवाला दुध प्यावे लागते, हा एक रिवाजच आहे.

आपण जर विवाहित असाल तर, तुम्ही पण याचा अनुभव घेतला असेल, तसे नसेल तर मग आपल्या प्रत्येक चित्रपटात कुठेतरी हे दृश आपणास बघण्यास मिळतेच.

new google

परंतु अनेक लोकांना याबद्दल माहीतच नाही कि, मधुचंद्राला नवरदेवाला दुध पिण्यासाठी देतात यामागे काही वैज्ञानिक कारण आहे. चला तर जाणून घेऊया काय आहेत ते कारण याबद्दल…

सुहागरात
सुहागरात

अनेक चित्रपटात आपण बघितले असेल, ‘सुहागारती’ नवविवाहित जोडप्याच्या खोलीला आणि पलंगाला फुलांनी सजवले जाते. यासोबतच त्यांच्या खोलीमध्ये एक ग्लास दुध अवश्य ठेवले जाते. हे दुध नवविवाहित वरासाठी असते. काही ठिकाणी तर वधुंसाठीहि दुधाचा ग्लास ठेवला जातो. हे दुध पिण्यामागे अनेक करणे आहेत.

यारात्री पिले जाणारे दुध हे खास पद्धतीने बनवले जाते. या दुधामध्ये केसर, हळद, काळी मिरी, बदाम आणि सौंफ मिसळले जाते. हि सर्व सामग्री टाकून दुधाला उकळले जाते आणि हेच कोमट दुध नवरदेवाला पिण्यासाठी दिले जाते.

या दुधामध्ये गोडीसाठी साखर नाही तर नेचुरल स्वीटनर मिसळले जाते. यासोबतच त्यामध्ये मध, मिश्री आणि मनुका टाकल्या जातात ज्यामुळे दुधाची पौष्टिकता आणखीच वाढते.

सुहागरात

दुधामध्ये सेरोटोनिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे मन शांत राहते. लग्नातील अनेक रिवाज पूर्ण करून आणि नव्या नात्यामध्ये प्रवेश करण्याच्या दबावामुळे दोन्ही नवविवाहित आश्वस्त झालेले असतात.

हे दुध पिऊन त्यांना थोडी मानसिक शांती मिळते. दुधामध्ये प्रोटीन्सची मात्रता भरपूर असते जी स्नायूंना अतिशय गरजेची आहे. लग्नाची तयारी हि अनेक दिवसांपासून सुरु असते, हे दुध पिल्याने दोघांचाही थकवा दूर होतो.

लग्नाच्या धामधुमीत खानपान व्यवस्थित न झाल्याने वधु-वराचे पाचन तंत्र बिघडले जाते, हे दुध पिल्यामुळे त्यांच्या पचनाला मदत होते हे पण एक महत्वाचे कारण आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here