आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

या हिवाळ्यात आपल्याला उबदार ठेवण्यासाठी हे 5 चहा नक्की प्या..

ऐन थंडीच्या दिवसात उबदार असे गरम-गरम चहाच्या पेल्याशिवाय आनंददायी असे काहीही नाहीये. गरम चहा होटाला लावून गरम चहाचा आस्वाद घेण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही.वाढती थंडी आणि त्यामुळे कुडकुडते शारिर यामध्ये चहाचा एक कप आपल्या शरीराला उबदार करून जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते आतड्यांना निरोगी ठेवण्यापर्यंत आरोग्यवर्धक चहाचे अनेक फायदे आहेत

आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अश्याच काही चहाबद्दल सांगणार आहोत जे थंडीच्या दिवसात तुम्हाला चांगला अनुभव देऊन तुमचं शरीर उबदार ठेवण्यास मदत करतील.

लेमन आणि पेपर टी:

चहा

new google

लिंबू आणि मिरपूड घालून तयार केल्या जाणारा हा चहा थंडीच्या दिवसात शरीरास उबदार ठेवण्यास फार उपयोगी पडतो.
या चहाचा एक पेला आपल्या शरीरातील डिटोकसमध्ये मदत करणारा तसेच रक्तदाब कमी करून तुमची आरोग्यशक्ती वाढवणारा आहे.  या चहामध्ये काळ्या मिर्चीची छोटीशी पूड किरकोळ आजारांशी लढा देण्याचे काम करते.

 

लेमन टी चा आणखी एक फायदा म्हणजे या चहाने घशातील खरखर कायमची बंद होईल. जी बऱ्यांच लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

हा चहा बनवण्यासाठी एक कप उकळत्या पाण्यात एक लिंबाचा रस आणि १/४ टी. स्पू मिरपूड पावडर घाला.
आणखी चांगल्या आरोग्यदायी फायद्यासाठी आपण यात चिमुटभर हळद सुद्धा घालू शकता. हे सर्व एक मिनिट उकळू द्या.
चहा गोड बनवण्यासाठी साखरेऐवजी थोडासा मध वापरलातरआजून चांगले होईल.

 

अश्वगंधा चहा:

चहा

 

अश्वगंध हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नाहीतर रक्तातील साखर (SUGAR LEVEL)स्थिर ठेवण्यास
मदत करते. शिवाय वाढती काळजी आणि चिंता कमी करण्यास सुद्धा अश्वगंध मोठी मदत करते.

हा हर्बल चहा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ३/४ इंच अश्वगंध मुळाचा तुकडा हवा आहे. एक वटी आणि अश्वगंधाचा हा तुकडा १०/१५ मिनिटापर्यंत उकळा. एकदा उकळी आली कि तो तुकडा बाजूला काढून उरलेल्या मिश्रणामध्ये १ टी स्पू मध घालून चांगल्या रीतीने मिक्स करा. गाळणीने चहा गाळून घ्या आणि आरोग्यदायी अश्वगंधा चहाचा आनंद घ्या..

 

दालचिनी आणि तुळशी चहा:

चहा

 

हिंदू धर्मात पवित्र असे स्थान असलेल्या तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुळशीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे रक्त साफ ठेवणे.म्हणूनच तिला (BLOOD CLEANER) असेही म्हटले जाते. तुळशी हि छातीला डिसोजेन्स करते आणि घशातल्या खोकल्यापासून आराम देते.

दुसरीकडे दालचिनी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी ठरत आली आहे. दालचिनीमध्ये प्रक्षोभक विरोधी दाहक गुणधर्म असतात.जे सामान्य रोगांपासून संक्रमित होण्यापासून आपल्याला वाचवतात.

हा चहा बनवण्यासाठी एक कप पाणी आणि सोबत ८/१० तुळशीचे पाने टाकून उकळवा.पाणी उकळत असताना आपण दालचिनीची काडी किंवा पूड त्यात टाकू शकता. चांगल्या आरोग्यासाठी सोबत चिमुटभर हळद घाला. सोबत साखरेच्या प्रमाणानुसार मध आणि थोडे लिंबाचा रस घालून चहा तयार करा.

आले आणि पुदीना चहा.

चहा

ताजा पुदिना हा केवळ आपल्या चहामध्ये सुगंध वाढवत नाही तर पचनप्रक्रियेस मदत देखील करतो.
तसेच पोटाच्या दुखण्यास सुद्धा आराम देण्याचे काम पुदिना करतो. आले हे तर सर्वच चहाप्रेमींसाठी आवडती गोष्ट आहे. असा एखादाच चहाप्रेमी असावा ज्याला आले घातलेला चहा प्यावा वाटत नाही.आले हिवाळ्यात पहार जास्त उपयोगी पडते. शरीर दिटोक्सिफाईड करण्यासोबतच रक्त साफ करण्यास सुद्धा आले मदत करते.

हा चहा बनवण्यासाठी प्रथम एक कप पान्यासोबत ६/८ पुदिन्याची पाने आणि १ किसलेले आले घाला.
आपण आल्याच्या फोडी सुद्धा टाकू शकतो परंतु खिसलेले आले जास्त प्रमाणात रस सोडतील.चहा ४ ते ५ मिनिट चांगल्या पद्धतीने उकळू द्या. आणि शक्य तेवढे चहा गरम असतांना पिला तर आरोग्यास फायदेशीर होईल.

 

मसाला चहा.

 

सर्वांत शेवटचा परंतु गुणकारी असा चहा म्हणजे क्लासिक मसाला चहा. यासठी प्रथम आपल्याला २ लवंगा ,१ लहान दालचिनी  २ काळी मिरी आणि २ हिरव्या वेलची एकत्र कुटून घेणे गरजेचे आहे. आता एका कढईमध्ये चहाच्या पाण्यासह हे कुटलेल मसाले उकळू  द्या.

आवडीनुसार मसाला पावडर साखर आणि दुध घाला. मध्यम आचेवर ५ मिनिट चहा चांगल्या रीतीने उकळून घ्या.एकदा चहा व्यवस्थित उकळला कि चहा गाळून गरम गरम मसाला चहाचा आनंद घ्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here