आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
हे ५ भारतीय खाद्यपदार्थ तुमच्या “Weight Loss Diet Plan” मध्ये असलेच पाहिजे!
जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा कार्बोहायड्रेट्स आणि चरबीचे (FAT)प्रमाण जास्त असल्यामुळे आपण भारतीय खाद्यपदार्थ तेवढे पसंत करत नाही.
भारतातील आहारात समाविष्ठ असणारे दोन मुख्य पदार्थ- भात आणि चपाती या दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात आणि भारतीय मसालेदार करीमध्ये अतिशय जास्त प्रमाणात चरबी (FAT)असते.
भारतीय खाद्यपदार्थहे दोन्ही पदार्थ जेवणातील कॅलरीचे प्रमाण वाढवतात म्हणून, यांचा समावेश आपल्या वजन कमी करण्याच्या डाइट मध्ये कोणीच करत नाही. सामान्यतः सर्वजन या भारतीय पदार्थांपेक्षा जास्त ओट , योगर्ट, आणि कोशिंबीरीसारखे वेस्टर्न सुपरफूड यांना आपली पहिली पसंत ठेवतात. यामध्ये खरी समस्या हि भारतीय खाद्यपदार्थांची नसून त्यांना तयार करण्याच्या पद्धतीची आहे.
प्रत्यक्षात भारतीय पदार्थ हे केवळ वजन कमी करण्यास नाही तर आपले शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करतात जर ते पदार्थ योग्यरीत्या तयार केले गेले तर. भारतीय पदार्थ आपण आहारात का सामील करावीत यांचे ५ मुख्य कारणे…वाचा सविस्तर….!

०१ ) चवदार मसाले.
भारतीय मसाल्यांमध्ये वापरण्यात येणारे हळद, काळी मिरी, जिरे, मोहरी यांसारखे अनेक मसाले हे केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर जेवणाला पौष्टिकही बनवतात. या मसाल्यांच्या औषधी गुणधर्मामुळे त्यांना प्रथामोपाचारातही वापरले जाते.
या मसाल्यांमध्ये आढळणारे anti-inflammatory, antibacterial आणि antioxidant गुणधर्म आपणास अनेक आजारांपासून कोसो दूर ठेवतात. हे मसाले आपणास अधिक काळ निरोगी तर ठेवतातच,
यासोबत आपल्या शरीरात असणारी अशुद्धता बाहेर काढून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गतिमान बनवतात. यांचा आणखी एक फायदा म्हणजे या मसाल्याच्या सेवनाने आपली पाचनशक्ती सुधारते.

०२ ) चांगले तेल (Healthy fats).
आपल्या आहारातील करी बनवण्यासाठी योग्य प्रमाणात फॅटवापरत असल्याचे सुनिश्चित करा. भारतीय पारंपारिक भोजन तयार करताना मुख्यतः मोहरीचे तेल, नारळाचे तेल आणि तूप वापरले जाते.
हे सर्व तेल योग्य प्रमाणात वापरले तर अत्यंत पौष्टिक आणि लाभदायक आहे. जेवण बनवताना जर आपण भरपूर प्रमाणात तेलच ओतले तर आपले जेवण नक्कीच नुकसानदायक ठरेल. यामुळे आपले अन्न हे कमी तेलात शिजवण्याचा प्रयत्न करावा जेनेकरून Healthy fats आपल्या साठी नक्कीच लाभदायक ठरतील.

०३ ) पौष्टिक धान्य.
चपाती म्हटलं कि मग आपण केवळ गव्हाची बनलेली चपाती हाच विचार करतो ज्यामध्ये कार्बची मात्रात अतिशय जास्त असते. परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या मिश्र धान्याने बनलेली चपाती हि अतिशय पौष्टिक असते.
या संपूर्ण धान्याने बनलेल्या चपातीत प्रथिने, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक जास्त प्रमाणात असतात.
०४ ) प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा अतिशय कमी वापर.

भारतीय खाद्य पदार्थ हे निरोगी असतात कारण ते घरीच ताजे बनवले जातात. चपाट्यांपासून ते करी पर्यंत, निरोगी आणि पौष्टिक घटकांचा वापर करून घरी सर्व काही तयार केले जाते.
प्रक्रिया केलेल्या अन्नापेक्षा वजन कमी करण्यासाठी घरगुती पदार्थ खाणे नेहमीच चांगले मानले जाते. खरं तर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे अत्यधिक सेवन हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.
म्हणूनच प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरीच बनवलेले पदार्थ खावे जेणेकरू आपण निरोगी राहतील.
०५ ) आहारात पदार्थांचे अनेक पर्याय (Wide variety)

दररोज सारखाच आहार घेतल्यामुळे कोणीही कंटाळू शकतो. आपण सर्वजण जेवणात बदलीचे पदार्थ आणि चव शोधू इच्छितो आणि त्यासाठी नेहमीच भारतीय आहार हा उत्तम पर्याय आहे.
सामान्यतः सर्वजन खाद्यापदार्थाचे नवनवीन प्रकार आणि चव शोधात असतो यासाठी आपण नेहमीच भारतीय पाककृतीवर अवलंबून राहू शकता.
पोहा, इडली, साबुदाणा खिचडी, उपमा, असे अनेक पदार्थ आहेत जे आपण खायला कधीही कंटाळत नाही. हे सर्व पदार्थ खाऊन आपण निरोगी तर राहू शकता सोबतच वजनही घटवू शकता.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
- या ४ देवतांच्या मूर्ती आपल्या घरात चुकूनही ठेऊ नये, वाचा सविस्तर …!
-
पोलिसांनी केली चक्क 3 वर्षांच्या कुत्र्याची डीएनए चाचणी.. प्रकरण जाणून आच्छर्य वाटेल..