आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
कोलयमा हायवे बनवण्यासाठी १० लाख लोकांचा बळी देण्यात आला होता..
वाचा सविस्तर…!
जगात असे अनेक रोड आहेत जे आपल्या विविधतेमुळे प्रसिध्द आहेत. एखादा आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी तर एखादा आपल्या नागमोठी आणि धोकादायक वळणांसाठी प्रसिध्द असतो.
परंतु जगात एक रोड असाही आहे, ज्याला बनवताना१० लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव घेण्यात आला.
होय वाचताना हे अजब वाटतेय परंतु हा सुंदर (कोलयमा) हायवे आहे रुसमधील सुदुर्वर्ती पूर्वी परिसरात. काही दिवसांपासून परत २०२५ किमी लांबीचा कोलयमा हायवे हा परत चर्चेमध्ये आला आहे.
कोलयमा हायवे हा पश्चिमेकडील निझने बेस्टयाख परिसराला पूर्वेच्या मगडानला जोडतो. एकेकाळी कोलयमा पर्यंत केवळ समुद्री मार्गाने किंवा विमानानेच पोहचले जायचे. इस १९३० च्या दशकात सोवियत संघातील स्टालिन हुकुमाशाहाच्या निगराणीतया हायवेचे काम सुरु झाले.
रुसमधील कोलयमा हायवेवर परत एकदा मानवी कंकाळ सापडले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रोडवर अनेक ठिकाणी रेती सोबत मानवी हाडके आणि कंकाळ मिळत आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर तपास सुरु केला आहे.
स्थानिक मान्यतेनुसार, हिवाळ्यात बर्फाने आच्छादून जाणाऱ्या या कोलयमा हायवेवर वाहने घसरू नये म्हणून मानवी हाडाकांना वाळूसोबत मिसळून रोडवर टाकण्यात आले आहे. या हायवेच्या निर्माणाची कहाणीही तेवढीच भयावह आहे, यासाठी २.५ ते १० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

कोलयमा हायवेची निर्मिती करण्यासाठी गुलगच्या १० लाख कैद्यांना आणि बांधवा मजदूरांना राबवण्यात ले होते. या कैद्यांमध्ये साधारण गुन्ह्यातील दोषी आरोपी आणि राजकीय दोषी लोकं सामील होती.
याच कैद्यांमध्ये महान कवी वरलम शलमोव हे पण होते, त्यांनी कोलयमा कँप मध्ये १५ वर्ष सजा भोगली होती. या परिसराचे वर्णन करताना वरलम शलमोव लिहितात कि,
“याठिकाणी काही कुत्रे आणि अस्वलं पण होती, हे जनावरे माणसांपेक्षा चांगली होती”
कोलयमा मध्ये १० वर्ष सजा भोगणारी ९३ वर्षीय एंटोनीना नोवोसाद म्हणतात कि, हायवे बनवताना या कैद्यांना काटेरी तारेच्या पलीकडील बेरीचे दाने जमा करताना पकडल्यास बंदुकीची गोळी मारल्या जात असे. मारल्या गेलेल्या कैद्यांना याच हायवेमध्ये पुरल्या जायचे.

या परिसरात गेलेल्या कैद्यानमधील केवळ २० टक्केच कैदी जिवंत परत येत असत. काही कैदी येथून पळून जायचे पण या परिसरात ते केवळ १५ दिवसंपार्यांतच जिवंत राहत. या कालावधीत ते कडाक्याच्या थंडीने किंवा अस्वलाच्या हल्ल्याने
मारल्या जायचे.
याठिकाणी सजा भोगणाऱ्यामध्ये, कवि वरलम शलमोव यांच्या सोबत अनेक महान शास्त्रज्ञ पण होते. यामध्ये रॉकेट वैज्ञानिक सर्गेई कोरोलेव हे पण होते.
सर्गेई कोरोलेव यांनी सजा भोगताना कसेबसे स्वताला जिवंत ठेवले आणि पुढे १९६१ मध्ये यांनीच रुसला अंतरिक्षात प्रथम मानव पाठवण्यासाठी मोलाचे कार्य केले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.