आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल १७ मुलीची फसवणूक….घातला ८० करोड रुपयांना गंडा.

नुकतेच हैदराबाद पोलिसांनी एका 42 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. परंतु या व्यक्तीवर असे आरोप आहेत की त्याने स्वत: ला भारतीय लष्कराचा एक मोठा अधिकारी म्हणून अनेक मुलींना लग्न करण्याचे वचन देऊन मुलींच्या कुटुंबांकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने सुमारे 17 मुलींची फसवणूक केली असून सुमारे ८० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांना याबाबत अनेक तक्रारी मिळाल्या होत्या आणि त्यानंतर शनिवारी पोलिसांनी त्याला पकडले.

मधुवथ श्रीनु नायक ऊर्फ श्रीनिवास चौहान असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी मधुवथ श्रीनु नायक हा आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील केल्लंपल्ली गावचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने फक्त 9 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.

पण त्याकडे पदव्युत्तर पदवी सुद्धा आहे. तो विवाहित आहे आणि त्यांच्या पत्नीचे नाव अमृता देवी आहे. एक मुलगा आहे जो इंटरमीडिएट अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. या आरोपीचे कुटुंब सध्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहत आहे. पण हैदराबादच्या सैनिकपुरी येथील जवाहर नगरमध्ये तो एकटाच राहतो.

 

आरोपीने आपल्या कुटूंबाला सांगितले होते की त्याला भारतीय सैन्यात नोकरी मिळाली आहे आणि तो मेजर झाला आहे त्याचवेळी या आरोपीने श्रीनिवास चौहान यांच्या नावाने बनावट आधारकार्डही बनवले. ज्यामध्ये त्याने त्याची जन्मतारीख, 12-7-1979, दर्शविली.

हा आरोपी मॅरेज ब्युरोमार्फत किंवा स्वतःच्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून अशा कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत होता. ज्या व्यक्तीला आपल्या मुलींचा विवाह त्याच्याशी करावा असे वाटते अशा मुलीच्या कुटूंबियांना तो भेटायचा आणि त्याचे बनावट आर्मी ओळखपत्र, फोटो आणि टॉय पिस्तुल दाखवून गंडा घालत असे.

 

या आरोपीने पुणे राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील पदवीधर असल्याचे आपले वर्णन केले आणि मुलीच्या कुटूंबाना सांगितले की तो सध्या सैन्याच्या हैदराबाद रेंजमध्ये प्रमुख आहे. तसेच तो आपल्याकडे सैनिकपुरी येथेही एक घर असून त्यामध्ये तीन कार आहेत असे सांगायचा पण शनिवारी पोलिसांना याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने लग्नाच्या नावाखाली सुमारे 17 महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केली असून सुमारे ८० कोटींची फसवणूक केली आहे.

आरोपींकडून पोलिसांना तीन बनावट पिस्तूल, तीन सैन्याचे गणवेश, बनावट आर्मी आयडी आणि आणखी काही बनावट कागदपत्रे सापडली आहेत. याशिवाय पोलिसांनी 85 हजार रुपये आणि त्याच्याकडून तीन कार जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिस त्याविषयी अधिक तपास करत आहेत आणि या घोटाळ्याच्या शोध घेण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आपण सुद्धा अशा व्यक्तीपासून लांबच रहा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here