आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

औषधांच्या स्ट्रीपवर असणाऱ्या लाल रंगाच्या पट्टीबद्दल वाचा सविस्तर..!

आपल्यापैकी अनेकजण आजही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे न जाता थेट मेडिकल स्टोअरवर जावून त्या आजारासाठी औषध खरेदी करतात, कधी कधी यामुळे आपणास बरेही वाटते परंतु याचे काही गंभीर परिणामही भोगावे लागतात.

कधी आपण जर लक्षपूर्वक बघितले तर आपल्या लक्षात येईल कि, औषधांच्या स्ट्रीपवर मागील बाजूस लाल रंगाची पट्टी बनवलेली असते. तुम्हाला या पट्टीबद्दल माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर..

औषध

new google

लाल रंगाच्या या पट्टीबद्दल डॉक्टरांना अधिक माहिती असते, परंतु सर्वसाधारण लोकांना याबद्दल जास्त जाही माहिती नसते. जर कोणी डॉक्टरांच्या सल्याबिना मेडिकल स्टोअरला जाऊन औषध खरेदी करून त्याचे सेवन करतात तर, आजार बरे न होता उलट दुसरीच समस्या उद्भवू शकते. त्यामुळे औषधं खरेदी करताना हलगर्जीपणा करू नये.

औषधांच्या पाठीमागील लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ आहे कि, हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीविना हे सेवन करता येत नाही आणि याची विक्रीही करू शकत नाही. एंटीबायोटिक औषधांचा गैरवापर थांबवण्यासाठी औषधांवर लाल रंगाची पट्टी बनवली जाते.

या लाल रंगाच्या पट्टीशिवाय औषधांवर आणखी काही महत्वाचे सूचनात्मक चिन्ह बनवलेले असते, आणि याबद्दल आपणास माहिती असणे जरुरी आहे.

औषध

काही विशिष्ठ औषधांच्या पट्टीवर RX लिहिलेले असते, RX चा अर्थ आहे कि त्या औषधांना केवळ डॉक्टरांच्या परवानगीनेच घ्यावे. तर काही औषधांवर NRX लिहिलेले असते याचा अर्थ या औषधांचे सेवन करण्याचे तेच डॉक्टर सांगू शकतात ज्यांच्या जवळ नाशा आणणाऱ्या औषधांचे योग्य प्रमाणपत्र आहे.

काही ठराविक औषधांवर XRX असेही लिहिलेले असते, याचा अर्थ आहे हे औषध आपणास केवळ डॉक्टरजवळच मिळू शकते याची विक्री कोणत्याही मेडिकल स्टोअरवर नाही होत. या औषधाला पेशंट थेट डॉक्टर जवळून घेऊ शकतो.

याव्यतिरिक्त असे अनेक चिन्ह औषधांवर असतात त्यामुळे यापुढे आपण मेडिकल स्टोअरवर जाऊन औषध न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्याला आपण दूर ठेऊ शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here