आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

या मंदिरात चक्क कुत्र्याची पूजा केली जाते….कारण जाणून थक्क व्हाल…!

आजपर्यंत आपण अनेक देवी देवतांच्या मंदिराबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्हाला एकूण धक्का बसेल कि भारतात एक मंदिर असेही आहे जिथे चक्क कुत्र्याची पूजा केली जाते.

हे मंदिर कुकुरदेव मंदिर म्हणून प्रसिध्द आहे. याठिकाणाची अजीब मान्यता आणि या मंदिराच्या निर्माणाची कहाणी हि सर्वांना अचंबित करणारी आहे. वाचा सविस्तर…

कुकुरदेव मंदिर हे छत्तीसगड मधील रायपुर पासून १३२ किमी दूर दुर्ग जिल्ह्यातील खपरी गावात स्थित आहे. या मंदिराच्या गर्भघरात चक्क एका कुत्र्याची मूर्ती स्थापित आहे. तसेच या मंदिरात एक शिवलिंगही आहे.

मंदिर

श्रावण महिन्यामध्ये या मंदिरात लाखोंच्या संखेने भाविक येतात. हे सर्व भाविक शिवलिंगासोबत कुत्र्याच्या प्रतिमेची (कुकुरदेव) तशीच पूजा करतात जसे कि नंदीची करतात.

कुकुरदेव मंदिर हे २०० मीटरमध्ये पसरलेले आहे. मंदिराच्या गर्भग्रहा शिवाय येथील प्रवेश द्वारावरही कुत्र्याची प्रतिमा लावलेली आहे. याठिकाणी अशी मान्यता आहे कि, कुकुरदेवांच्या दर्शनाने कधीही कुत्रा चावत नाही. कुकुरदेव मंदिर हे एक स्मारक आहे, हे स्मारक एका इमानदार कुत्र्याच्या आठवणीमध्ये बनवलेले आहे.

असे म्हणतात कि अनेक वर्षांपूर्वी या गावात काही बंजारा लोक राहण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत एक कुत्रा पण होता. एका वर्षी फार मोठा दुष्काळ पडला होता तर त्या बंजाऱ्याने एका साहुकाराकडून काही पैसे उधार घेतले होते आणि त्या साहुकाराजवळ आपल्या कुत्र्याला गहान ठेवले.

 

काही दिवसांनी त्या सावकाराच्या घरी चोरी झाली आणि चोरांनी सर्व चोरलेला माल एका ठिकाणी जमिनीत पुरून ठेवला होता. परंतु त्या कुत्र्याला याबद्दल माहित झाले, त्याने सावकाराला त्या ठिकाणी नेले आणि त्यांना सर्व सामान तिथेच मिळून आले.

मंदिर

सावकाराने कुत्र्याला खुश होवून सोडून दिले आणि त्याच्या गळ्यामध्ये एक चिठ्ठी लिहून बांधली. कुत्रा घरी आलेला पाहून बंजार्याला वाटले कि हा कुत्रा पळून आला आहे म्हणून त्यांनी त्याला काठीने चांगलेच झोडपले त्यामुळे तो कुत्रा जागीच गतप्राण झाला.

कुत्रा मेल्यावर त्यांना गळ्यातील चिठ्ठी दिसली आणि टी चिठ्ठी वाचून त्यांना फार पश्चाताप झाला, म्हणून त्यांनी कुत्र्याला पुरून त्यावर त्याचे स्मारक बांधले. हेच स्मारक आज कुकुरदेव मंदिर म्हणून ओळखले जाते.

एका कुत्र्याच्या इमानदारी साठी बनवलेले हे मंदिर आज सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here