आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
२६/११ च्या हल्ल्यात या अमेरिकन सैनिकाने 157 लोकांचा जीव वाचवला होता.. वाचा सविस्तर….
२६/११ ला मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्याला काही दिवसांपूर्वीच १२ वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातून आलेल्या आतंकवाद्यांनी निष्पाप १६६ लोकांचा नाहक बळी घेतला होता. आणि ६०० लोकांना गंभीररीत्या जखमी केले होते.
या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या अनेक बहादूर शिपायांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती, त्यांच्यापैकी अनेकांना आपण दरवर्षी २६/११ ला आदरांजालीही वाहतो. परंतु या हल्ल्यात काही अशा नायकांनीही आपले अनमोल योगदान दिले होते ज्यांना फार लोकं ओळखत नाहीत.
अशाच हिरोंमध्ये नाव घेतले जाते अमेरिकेच्या कॅप्टन रवि धर्निधिरका (Ravi Dharnidharka)यांचे. कॅप्टन रवि धर्निधिरका यांनी २६/११ ला ताज हॉटेल मध्ये फसलेल्या १५७ लोकांचे प्राण मोठ्या शिफारतीने वाचवले होते. आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया कॅप्टन रवि धर्निधिरका यांच्याबद्दल सविस्तर…..
कोण आहेत कॅप्टन रवि धर्निधिरका?
कॅप्टन रवि धर्निधिरका यांचे पायमुळे हे भारताशी जुडलेली आहेत. अमेरिकेत राहत असतानाही ते सतत भारतात येत असत. मुंबईमध्ये त्यांच्या परिवारासोबत अन्य नातेवाईकही राहतात, त्यांना भेटण्यासाठी रवी हे सतत भारतात येत होते.
२००४ ते २००८ या काळात इराकमधील फालुजा शहरात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. म्हणून ते ४ वर्ष भारतात येऊ शकले नाही. २००८ साली त्यांचे मिशन पूर्ण झाल्यामुळे ते आपल्या सुट्ट्या परिवारासोबत घालवण्यासाठी मुंबईला आले होते.
रवि धर्निधिरका यांचे मुंबई आणि ताज हॉटेलशी नाते.
कॅप्टन रवि धर्निधिरका जेंव्हा कधी मुंबईला यायचे तेंव्हा ते हॉटेल ताज मध्ये आपल्या परिवारासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी जायचे. त्याचप्रमाणे याही वेळी २६/११ ला आपल्या परीवारासोबत ताज हॉटेलच्या २० व्या मजल्यावरील लेबनानी
रेस्टोरंट “सुक” मध्ये आले होते. याठिकाणी त्यांच्या परीवाराव्यातिरिक्त अनेक विदेशी पर्यटकही जेवणाचा आस्वाद घेत होते.
सर्वकाही ठीक चालत असताना अचानक हॉटेलच्या खालच्या माळ्यावरून गोलीबाराचा आणि लोकांच्या किंचाळण्याचा आवाज सुरु झाला. कुठे आणि काय घडले याचा सर्वजन मागोवा घेत असताना कॅप्टन रवि धर्निधिरका यांच्या भावाचा त्यांना फोन आला आणि त्याने खबर दिली कि, ताज हॉटेलवर काही आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे.
रवि धर्निधिरका यांची समयसूचकता
हॉटेल मध्ये आतंकवादी घुसले आहेत हे माहित झाल्यावर रवी यांनी स्वताला सावरले कारण हि परिस्थिती त्यांच्यासाठी नवीन नव्हती. त्यांच्यामधील सैनिक झाला आणि त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी पुढे येऊन सूचना देण्यास सुरुवात केली.
त्याच वेळी त्यांना रेस्टोरांट चा एक दरवाजा दिसला जो कि काचेचा होता. आतंकवादी त्यादिशेने ग्रेनेड फेकू शकतात हे समजल्यावर त्यांनी सर्वांना एका मोठ्या हॉलमध्ये जाण्यास सांगितले आणि त्यांनी स्वतः त्या हॉलच्या दरवाजामागे खुर्च्या, सोफे
आणि मिळेन ते जड समान ठेवले.
हे सर्व झाल्यावर ते खिडकीतून बाहेरील दृष्य पाहण्याचा प्रयत्न करू लागले, आणि अचानक हॉटेलच्या सातव्या माळ्यावर २ बॉम्बस्फोट झाले आणि तो माळा आगीने लपेटून गेला. रवी यांना आता हा विचार सतावत होता कि आगीमुळे शोर्टसर्किट होईल आणि २० व्या माळ्यावरही आग पोहचू शकते.
तेथे असणारे लोक आता चांगलेच भेदरून गेले होते, त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय न घ्यावा म्हनुन रवी यांनी त्यांना सांगितले कि,
“सैनिक त्यांच्या मदतीला आले आहेत. खाली आग लागली आहे आणि आपणास पायऱ्यांच्या मार्गाने बाहेर पडावे लागेल.”
बाहेर जात असताना रवी यांनी काही धाडशी लोकांना पुढे राहण्यास सांगितले जेणेकरून महिला आणि लहान मुलांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. पायऱ्यांच्या मार्गाने रवी यांच्यासह १५७ लोक आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळत होते. बाहेर जाताना रवी यांनी सर्वांना आपल्या पायातील बूट काढण्यास आणि मोबाईल बंद करण्यास सांगितले सर्वाना पुढे करत रवी मात्र एकटेच हॉलमध्ये राहिले होते.
जवळजवळ सर्वजन बाहेर आले होते आणि तेंव्हा रवी यांच्या लक्षात आले कि एक बुजुर्ग महिला व्हीलचेअरवर मागेच राहिली आहे. एक सैनिक स्वताची कधीच काळजी करत नाही हे रवी यांनी दाखवून दिले, आणि परत माघारी येऊन त्या महिलेला उचलून धावत ते बाहेरच्या दिशेने निघाले.
२० व्या माळ्यावरून एका महिलेला आपल्या हातात उचलून खाली आणणे तेही पायऱ्यांनी हि गोष्ठ जरा अश्यक्यच वाटते परंतु रवी यांनी ते शक्य करून दाखवले. बाहेर सुखरूप पडल्यावर रवी यांच्या रूपाने देवच आपल्या मदतीला आला असे सर्वांना वाटत होते. हातात शस्त्र नसतानाही एक सैनिक लढाई जिंकू शकतो हे रवी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा..