आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

कोरोणा व्हायरस भारतातूनच आला आहे: चीनी संशोधकांचा खळबळजनक दावा?

 

यापूर्वी चीनी मिडिया आणि सरकारने पुरेशे पुरावे नसताही कोरोनाव्हायरसच्या उद्रेकासाठी इटली, अमेरिका आणि युरोपवर दोषारोप ठेवले होते. आता तर चीनी संशोधकांनी वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या मते करोडो लोकांना मृत्युलोकी पाठवनाऱ्या घातक कोरोणा विषाणूचा उगम हा २०१९ च्या उन्हाळ्यामध्ये भारतातच झाला होता.

Chinese Academy of Sciences च्या संशोधकांच्या पथकाने असा दावा केला आहे कि, कोविड विषाणू हा २०१९ च्या उन्हाळ्यामध्ये भारतात उगम झाला आहे आणि तो व्हायरस दुषित पाण्यामार्फत जनावारांकडे आणि जनावरांकडून मानवाकडे पसरला आहे. या व्हायरस कडे कोणाचेही लक्ष नव्हते, परंतु चीनमधील वूहान पर्यंत पोहचल्या नंतर या विषाणूने सर्व जगाचे लक्ष अपल्याकडे वेधून घेतले.

कोरोणा व्हायरस

चीनच्या एका अहवालानुसार, कोविड १९ चा मुळ उगम कुठे झाला होता हे शोधून काढण्यासाठी चिनी संशोधकांनी फिलोजेनेटिक विश्लेषणाचा (phylogenetic analysis) वापर केला आहे. डेली मेलच्या एका अहवालानुसार,
सर्वसाधारण पेशींप्रमाणे व्हायरस देखील पुनरुत्पादित होताना बदलतात, म्हणजेच प्रत्येक वेळी जेव्हा ते स्वत: ची प्रतिकृती बनवतात तेव्हा त्यांच्या डीएनएमध्ये छोटे बदल घडतात.

यावर भारताने काही म्हणण्याअगोदरच चीनला चपराक दिली ती ग्लासगो विद्यापीठाचे तज्ज्ञ डेव्हिड रॉबर्टसन यांनी. डेव्हिड रॉबर्टसन यांच्यामते चिनी संशोधकांनी मांडलेला सिद्धांत हा अतिशय चुकीचा आहे. तसेच चीनी संशोधकांनी काढलेला निष्कर्ष कोरोणा व्हायरस बद्दल आम्ही जितके जाणतो त्याच्या विपरीत आहे.

स्वताची चूक लपविण्यासाठी चीनी सरकारने दुसऱ्याकडे दोषारोप करत बोट दाखवणे हे काही नवीन नाही, त्यांनी यापाहीलेही इटली, अमेरिका आणि युरोपवर दोष लावले होते ते पण कोणताही पुरावा नसताना.

कोरोणा व्हायरस

भारत आणि चीन यांच्यातील राजकीय वाद आता तर कुठे शांत व्हायच्या मार्गावर आहे आणि त्यातच हा दावा हे सर्व चीन कोणत्या हेतूने करत आहे हे त्यांनाच ठाऊक. वूहान मध्ये आढळलेला विषाणू हाच मुळ कोरोणा विषाणू आहे असे अनेक देशातील संशोधकांनी स्पष्ठ केले असताना दुसऱ्याकडे बोट दाखवणे हा किती मोठा मूर्खपणा आहे हे चीनला कधी कळणार?

चीनने कितीही विचित्र दावे केले तरीही, कोरोणा व्हायरस हा चीनमध्येच उदयास आला असे मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या शीर्ष आपत्कालीन तज्ञाने शुक्रवारी म्हटले आहे कि, कोरोनायरस हा चीनमध्ये उदयास आला नाही असे म्हणणे who साठी हे फार कठीण आहे कारण इथेच प्रथम फूड मार्केटमध्ये हा विषाणू आढळून आला होता.

गेल्या मंगळवारी चिनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की चीनि सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना हे कोविड १९ च्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी चीनचा दौरा करत आहेत आणि त्यांचा अहवाल लावकच जाहीर केला जाईल.

कोरोणा व्हायरस

सोमवारी, डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी सांगितले त्यांना बीजिंगकडून आश्वासन मिळाले आहे आणि लवकरच कोविड १९ च्या प्राण्यांमधील उत्पत्तीची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञ चीनमध्ये जाऊन परीक्षण करू शकतील.

मे महिण्यात जिनेव्हास्थित डब्ल्यूएचओच्या निर्णय घेणार्‍या जागतिक आरोग्य असेंब्लीच्या (डब्ल्यूएचए) वार्षिक सभेने व्हायरसच्या उत्पत्तीची चौकशी करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर केला आहे. चीनने त्यांच्या या ठरावाला पाठींबा दर्शवला होता, तसेच गेल्या महिन्यात अनेक देशांनी डब्ल्यूएचओला चीनमध्ये आपले पथक पाठवून योग्य माहिती जमा करावी आणि ती सर्वांना जाहीर करावी असे सांगितले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here