आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

उपछाया चंद्रग्रहणाबद्दल वाचा सविस्तर….

२०२० सालचे शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) हे आज ३० नोव्हेंबरला लागणार आहे. हे चंद्रग्रहण उपछाया (Shadow eclipse) चंद्रग्रहण असून हे २०२० मधील चौथे चंद्रग्रहण आहे, याप्रथम १० जानेवारी, ५ जून आणि ५ जुलै रोजी चंद्रग्रहण लागले होते.

२०२० मधील शेवटचे चंद्रग्रहण हे अतिशय खास मानल्या जात आहे, कारण याच दिवशी कार्तिक स्नान पूर्ण होणार आहे, तसेच शीख धर्मियांचे संस्थापक गुरु नानक यांची ५५१ वी जयंतीही आहे. सोमवारी लागणाऱ्या या ग्रहणाच्या दिवशी कार्तिक पोर्णिमा असल्यामुळे हे ग्रहण खास आहे.

उपछाया चंद्रग्रहण
उपछाया चंद्रग्रहण

चंद्रग्रहणाचा प्रारंभ: ३० नोव्हेंबर दुपारी १ वाजून ४ मिनिट.
चंद्रग्रहणाचा मध्यकाल: ३० नोव्हेंबर दुपारी ३ वाजून १३ मिनिट.
चंद्रग्रहण समाप्ती: ३० नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजून २२ मिनिट.

उपछाया चंद्रग्रहण म्हणजे काय?

पूर्ण आणि अंशिक ग्रहणाव्यातिरिक्त एक उपछाया ग्रहणही असते. पृथ्वीची छाया हि चंद्रावर पडत नाही तर केवळ पृथ्वीची उपछाया हि चंद्रावर पडते, आणि यामुळे चंद्रावर एक धुकेदार सावली दिसते यालाच उपछाया चंद्रग्रहण असे म्हणतात. या घटनेत पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करून चंद्राची प्रतिमा डागलेली दिसते.

 

उपछाया चंद्रग्रहण
उपछाया चंद्रग्रहण

जेंव्हाकधी एखादे चंद्रग्रहण सुरु होते तेंव्हा, चंद्र हा ग्रहण सुरु होण्यापूर्वी पृथ्वीच्या सावली प्रवेश करतो, यामुळेच चंद्राची प्रतिमा किंचित मंद होते आणि त्याचा प्रभाव ओसरतो यालाच सबसॉइल म्हणतात. आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या वास्तविक कक्षेत प्रवेश करणार नाही, म्हणून त्याला ग्रहण म्हटले जाणार नाही.

उपछाया चंद्रग्रहणाला कोणतेही सुतक पडणार नाही.

 

आजच्या या  चंद्रग्रहणाबद्दल अनेक ज्योतीशाचार्यांचे म्हणणे आहे, हे वर्षातील शेवटचे ग्रहण आहे. हे ग्रहण वृष राशी आणि रोहिणी नक्षत्राला प्रभावित करणार आहे. प्रत्येक ग्रहणाचा एक ठराविक सुतक कालावधी असतो, त्यामध्ये देवाचे नामस्मरण
आणि मंत्राचे जप करण्याचे सांगितले जाते. आजच्या ग्रहणात कोणताही सुतक कालावधी असणार नाही कारण हे एक उपछाया चंद्रग्रहण आहे.

सुतक कालावधी म्हणजे काय:

 

उपछाया चंद्रग्रहण
उपछाया चंद्रग्रहण

भारतीय संस्कृतीमध्ये सुतक चे खूप महत्व आहे. चंद्रग्रहणाच्या ९ तास अगोदरपासून लागणाऱ्या सुतक कालावधीमध्ये सर्व शुभ कार्य टाळले जातात. या कालावधीत सर्व देवी-देवतांच्या मंदिराचे गर्भग्रह बंद ठेवले जातात. काही लोकांच्या मते,
गर्भवती महिलांनी या काळात स्वयंपाक, धारदार आणि टोकदार वस्तूंपासून दूरच राहावे. चंद्र ग्रहणाचे सुतक हे ९ तास अगोदर तर सूर्यग्रहणाचे सुतक हे १२ तास अगोदर सुरु होते.

उपछाया चंद्र ग्रहण कुठे दिसणार?

३० नोव्हेंबरला लागणारे हे चंद्र ग्रहण ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, यूरोप, साउथ अमेरिका, प्रशांत आणि अटलांटिक महासागर याशिवाय आशिया खंडातील काही देशातही दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here