आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

हे आहेत रात्रीतूनच करोडपती बनलेले लोकं …!

आपल्या सभोवताली अशा काही घटना घडतात कि, “नशीब बदलण्यास काही वेळ लागत नाही” हि म्हण अतिशय खरी असेच वाटू लागते. नशीब कधी कुणाला काय बनवेल याचा काही नेम नाही.

काही दिवसांपूर्वी आपण बघितलेच असेल कि, ‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या त्या बुजुर्ग बाबाचे नशीब कसे रात्रीतूनच बदलले. केवळ एका व्हिडीओ मुळे त्यांचे दुःखाचे अश्रू हे आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलले.

आज आम्ही अशाच ५ व्यक्तींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नशिबाने त्यांना अशी साथ दिली कि, ते लोक रात्रीतूनच करोडपती झाले. वाचा सविस्तर…!

new google

०१ ) Josua Hutagalung (९.८ करोड)

करोडपती

 

एका न्यूज चॅनलच्या अहवालानुसार, सुमात्रातील कफन पेटी बनवणारे ३३ वर्षीय Josua Hutagalung यांच्या घराच्या छतावर मध्यरात्री अचानक २.१ किग्रा वजनाचा उल्कापिंड पडला होता. या उल्कापिंडाला ९.८ करोड रुपयांना विकून Josua Hutagalung हे रात्रीतूनच करोडपती झाले आहेत. हा उल्कापिंड अरबों वर्ष जुना होता आणि त्याचे आजचे बाजारमूल्य ६३००० प्रती ग्राम इतके होते.

०२ ) Saniniu Laizer (२४.७ करोड रुपये ) 

करोडपती

 

याच वर्षी जून महिन्यात तंज़ानियातील Saniniu Laizer नामक एका खानमध्ये काम करणाऱ्या खानिकाने ९ किग्रा आणि ५ किग्रा वजनाचे रत्न शोधले होते. हे रत्न तंज़ानियाच्या इतिहासातील सापडलेले सर्वात मोठे रत्न होते म्हणून तेथील सरकारने त्यांना 7.74 बिलियन तंज़ानिया शिलिंग (२४.७ करोड रुपये ) पुरस्कार म्हणून दिले. आणि या प्रकारे Saniniu Laizer हे रात्रीतूनच करोडपती झाले.

०३ ) Harikrishnan V Nair ( २४.२० करोड )

करोडपती

 

दुबईमध्ये वास्तव्यास असणारे भारतीय नागरिक Harikrishnan V Nair यांनी २४.२० करोड रुपयांची लॉटरी जिंकली आणि ते रात्रीतूनच करोडपती झाले. Harikrishnan V Nair यांनी लॉटरीचे 3 तिकिटे खरेदी केली होती, त्यातीलच एका तिकिटाने त्यांना रात्राीतूनच करोडपती बनवले आहे.

०४ ) Eric Tse (२८७४४ करोड)

करोडपती

आपल्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून अनेक वस्तू मिळाल्या असतील, परंतु २४ वर्षीय Eric Tse या युवकाला त्याच्या वडिलांकडून birthday gift म्हणून चक्क २८७४४ करोड रुपये मिळाले आहेत. वाढदिवशी वडिलांच्या कंपनीचे १/५ शेअर मिळाल्याने Eric Tse हा रात्रीतूनच अरबपती झाला आहे.

०५ ) Porunnan Rajan (१२ करोड )

करोडपती

फेब्रुवारी २०२० मध्ये केरळचे रहिवाशी असणारे Porunnan Rajan यांनी १२ करोड रुपयांची लॉटरी जिंकली आहे. रबर टॅपर म्हणून काम करणाऱ्या Porunnan Rajan यांना ST२६९६०९ या नंबरच्या तिकिटाने रात्रीतूनच करोडपती बनवले आहे. सर्व कर कपात करून त्यांना ७.२ करोड रुपये मिळाले आहेत.

या सर्व घटनांवरून एक गोष्ठ तर साफ होते, नशीब बदलण्यास काही वेळ लागत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here