आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मुलतानी मातीच्या या फायद्यांबद्दल तुम्हाला माहित आहे का?

मुलतानी माती हा एक नैसर्गिक आणि सर्वांच्या परिचयाचा घटक आहे, याचा वापर अनेक ब्युटी प्रोडक्ट बनवण्यासाठी केला जातो. निसर्गाचे वरदान असलेली मुलतानी माती हि केस आणि त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे.

मुलतानी माती हि मुख्यतः फेस पॅक म्हणून त्वचेला चमकदार करण्यासाठी आणि मुरुम, चट्टे, टॅनिंग इत्यादी त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते.

मुलतानी माती त्वचेतून अशुद्धी, घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी देखील प्रामुख्याने वापरली जाते.

new google
चला तर मग जाणून घेऊया मुलतानी माती हि त्वचेसंबंधित अनेक समस्यांवर कशी फायदेशीर आहे?

 

मुलतानी मातीचे अन्य काही फायदे…

मुलतानी माती

०१) शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी.

मुलतानी मातीच्या सेवनाने शरीराची पचनक्षमता वाढते. पचनक्षमता वाढल्यामुळे रक्तभिसरण (Blood Circulation) सुरळीत होऊन शरीरावरील अनावषक मृत त्वचा (Dead Skin) निघून त्वचा चमकदार होते.

०२) अलर्जी

आपणास जर कोणती अलर्जी किंवा इंफेक्शन असेल तर, थोडीसी मुलतानी माती गुलाब जल सोबत मिसळून पेस्ट बनवा आणि त्या इंफेक्शनच्या जागी लावा तुम्हाला त्यापासून अवश्य आराम मिळेल.

०३) एंटीसेप्टिक

मुलतानी मातीमध्ये असे काही एंटीसेप्टिक गुण आढळतात यामुळे घाव आणि कापलेल्या जखमेवर उपचार केल्या जातो. जखमेवर केवळ मुलतानी मातीची पेस्ट लावल्यास लवकरच घाव भरून निघतो.

 

मुलतानी माती

०४) पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी.

कठोर हवामान आणि सतत सूर्याच्या संपर्कात आल्यामुळे (Pigmentation)ची समस्या उद्भवू शकते. मुलतानी माती, नारळपाणी आणि साखर योग्य प्रमाणात मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची (Pigmentation) समस्या दूर होते.

०५) सूज कमी करण्यासाठी.

मुलतानी माती हि अतिशय थंड आणि आरामदायक असते, या गुणधर्मामुळे शरीरावरील कोणतीही सूज कमी होते. त्वचेला फ्रेश बनवते आणि शीतलता बनवून ठेवते. मुलतानी मातीच्या या फायद्यांबद्दल सर्वांना माहित असणे हे जरुरी आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here