आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

आजच्या IND vs AUS सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या नावावर नवा रेकॉर्ड, २१ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.

ऑस्ट्रेलिया सोबत चालू असलेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी, सहाव्या विकेटसाठी १०८ बॉलमध्ये १५० रनांची पार्टनरशिप केली आहे. यासोबतच या दोघांनी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर करत, २१ वर्ष जुना रेकॉर्डहि मोडला आहे.

हार्दिक पंड्या आणि जडेजाचा नवा रेकॉर्ड.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यातील हि पार्टनरशिप ऑस्ट्रेलिया विरोधात एकदिवशीय सामन्यातील भारताची सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप बनली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सदागोपन रमेश आणि रॉबिन सिंग यांच्या नावावर होता. या दोघांनी १९९९ मध्ये कोलंबोच्या SSC (सिंहली स्पोर्ट्स क्लब) या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरोधात सहाव्या विकेटसाठी १२३ रनांची पार्टनरशिप केली होती.

भारताची एकदिवशीय सामन्यात सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप हि अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नी यांच्या नावावर आहे. रायडू आणि बिन्नी यांनी हरारे मध्ये झिम्बाब्वे विरोधात २०१५ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात १६० रनांची पार्टनरशिप केली होती.

त्यांच्या पाठोपाठ २ नंबरवर आहे महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांची झिम्बाब्वे विरोधातील २००५ मधील १५८ रनांची पार्टनरशिप.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या ऑलराऊंडर.

ऑस्ट्रेलिया सोबत चालू असलेल्या तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६० रन बनवले आहेत. आणि हार्दिक पंड्याने ७ चौके आणि एका षटकाराच्या मदतीने ९२ रन बनवले आहेत.

हार्दिक पंड्या आजही आपले पहिले शतक झळकवण्यापासून चुकला, परंतु आजचा हा ९२ रानाचा स्कोर त्याचा वयक्तिक सर्वाधिक आहे. सिडनी ग्राउंडवर खेळल्यागेलेल्या दुसऱ्या सामन्यातही हार्दिकने ९० रनाची पारी खेळली होती.

हार्दिक आता एक चांगला ऑलराऊंडर म्हणून समोर येत आहे, भारताला जेंव्हा गरज असते त्याच वेळी एक चांगली खेळी हार्दिकच्या बॅटमधून येत आहे.

जडेजा आणि पंड्या यांच्या या खेळीच्या मदतीने भाताचा स्कोर ३०० पार होऊ शकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० ओवर मध्ये ५ विकेट गमावून ३०२ रन बनवले आहेत. कर्णधार कोहलीनेही ५ चौक्यांच्या मदतीने ६३ रन बनवले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here