आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अस्थमाची समस्या असलेल्या लोकांनी ह्या 5 चहाचे सेवन दररोज करावे, अवश्य आराम मिळेल…!

वाढते वायू प्रदूषण हि एक सर्वांसाठी गंभीरतेची बाब आहे. त्यातच अस्थमा असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. अस्थामामध्ये आपले वायुमार्ग अरुंद होतात आणि त्यावर सूज येते तसेच वायुमार्गात कफ तयार होतो. यामुळे आपणास श्वासोच्छवास आणि खोकला येण्यास अडचण येते.

अस्थमा रुग्णांसाठी हर्बल चहा आणि काढा हे अतिशय फायद्याचे असते. ह्या हर्बल चहांमुळे श्वास घेण्यास मदत होते, कफ कमी करते आणि अस्थामापासून आराम मिळतो.

अस्थमा असल्यास आपण जेंव्हा आपला श्वास बाहेर सोडतो तेंव्हा त्रास होतो. काही लोकांसाठी अस्थमा हा किरकोळ आजार आहे परंतु काही रुग्णांसाठी अस्थमा एक महाभयंकर आजार आहे आणि यामुळे त्यांच्या रोजच्या कामामध्ये अडचणी येतात.

new google

अस्थमा

अस्थमापासून सुटकारा मिळवण्यासाठी अनेक उपचार आहेत, परंतु काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचारांनी अस्थमाला बराच फरक पडतो. या हर्बल उपचारांनी अस्थामाचे किरकोळ लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया हर्बल चहा कसा बनवायचा याबद्दल…!

अस्थामापासून आराम देणारे हर्बल पेय.

०१) अद्रक (आले) चहा. (Ginger tea)

आल्यांपासून अनेक प्रकारचे काढे बनवले जातात. आले पाण्यात उकळून अद्रक चहा बनवली जाते, तसेच हि अद्रक चहा अनेक बायोएक्टिव आणि पोषकतत्वांनी भरपूर आहे. याव्यतिरिक्त अद्रक हि अस्थमाचे लक्षणे दूर करण्यासही अत्यंत फायदेमंद आहे. अद्रक मध्ये असलेले हर्बल गुणधर्म वायुमार्गात आलेल्या सुजेला कमी करते, आणि अस्थमापासून आराम देते.

०२) काळी चहा (Black tea)

काळी चहा (Black tea)मध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन असते, कॅफीन वायुमार्ग मोकळा करण्यास मदत करते आणि फुफुसांचे काम सुरळीत करण्यासही मदत करते. कॅफीन अस्थमाचे लक्षणे दूर करून आराम मिळवून देते. यामुळे अन्य काही लाभही मिळतात जसे कि, काळ्या चहामुळे हृद्य रोग आणि टाइप 2 मधुमेह यांची जोखीमही कमी होते.

०३) लीकोरीस चहा.

लीकोरीस चहा हि लीकोरीस प्लांटच्या मुळ्यापासून बनवली जाते. याचा स्वाद हा कडसर असतो, परंतु हा अस्थमासाठी अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेद आणि पारंपारिक चिकित्सा पद्धतीमध्ये अनेक उपचारांसाठी लीकोरीसचा वापर केल्या जात आहे. अल्कोहल कंपाऊंड (ग्लाइसीर्रिज़िन)चा अर्क हा अस्थामाचे लक्षणे दूर करण्यासाठी वापरल्या जातो.

०४) निलगिरी चहा.

हि चहा निलगिरीच्या पानांपासून बनवली जाते. या चहामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सिडेंट आणि निलगिरीचे अत्यंत गुणकारी गुणधर्म असतात. नीलगिरी चहाने अस्थमाचा इलाज तर होतोच, परंतु त्यासोबत सुजन कमी होण्यासही मदत होते.
निलगीरीमुळे वायुमार्गातील कफ कमी होतो, आणि फुफ्फुसातील अंतर्मार्गाचा विस्तार होतो.

०५) ग्रीन चहा (ग्रीन tea)

अनेकांच्या पसंतीस उरलेले ग्रीन टी हे एक अत्यंत पोषक पेय आहे, ज्यामध्ये एंटीऑक्सिडेंट्सची भरमार असते. काही शोधांनुसार, ग्रीन टी पिल्याने अस्थमाचा त्रासही कमी होतो. ग्रीन टीमध्ये असलेले एंटीऑक्सिडेंट्स हे फुफ्फुसावर
आलेली सूज कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टी मध्ये असणारी कॅफीन हि वायुमार्ग मोकळा आणि आरामदायक बनवते.

या लेखात केवळ सामान्य माहिती आहे, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय अभिप्राय नाहीत. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ  डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here