आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

क्रिकेट सोडून चक्क शेती करतोय भारताचा माजी कर्णधार…!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (mahendra singh dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर पूर्ण वेळ आता आपल्या परिवारासोबत राहत आहे, आणि आपल्या बिजनेस कडे खास लक्ष देत आहे. धोनीने काही दिवसांपासून डेअरी फार्म सोबतच ऑर्गेनिक शेती करण्यासही सुरुवात केली आहे.

धोनी रांचीच्या धुर्वा येथील सेम्बो परिसरात 55 एकरात शेती करीत आहे. त्यासाठी धोनीने मध्यप्रदेशातून २००० कडकनाथ कोंबड्यांचे पिल्लेही मागवले आहेत.

आता पोल्ट्रीफार्म सोबत तो दुध आणि ऑर्गेनिक शेतीही करत आहे. धोनीच्या फार्महाऊसमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन देखील होत आहे. चला तर जाणून घेऊया

new google

क्रिकेट

धोनीच्या फार्महाऊसची विशेषतः

भारतीय क्रिकेट मधील सर्वाधिक सफल कर्णधार म्हणून ओळखल्या जाणारा महेंद्रसिंग धोनी हा सदैव जमिनीशी जुडलेला म्हणून ओळखल्या जातो. त्याच्या जीवनात त्याने आजपर्यंत खूप संपती कमावली आहे, परंतु धोनी आजही रांचीमध्ये एका सर्वसाधारण व्यक्तीसारखे आयुष्य जगत आहे.

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर धोनी कोणताही बिजनेस करू शकला असता, परंतु जमिनीशी असलेल्या नात्यामुळे तो सध्या फार्मिंग करत आहे. काही दिवसांपूर्वी मिडियामध्ये बातमी आली होती कि त्याने मध्यप्रदेशातून २००० कडकनाथ पिल्ले ऑर्डर केले आहेत.

पोल्ट्रीफार्म सोबत शेती हा एक चांगला पर्याय आहे आणि तोच धोनीने निवडलेला आहे. अधून माधून धोनीचे त्याच्या शेतातील फोटो सोशल मिडीयावर झळकलेले दिसतात.

क्रिकेट

धोनीच्या फार्मवर टमाटर , फुलगोबी, पत्ता गोबी, ब्रोकोली इत्यादीची शेती केली जात आहे. यातील टमाटरचे उत्पादन सध्या चालू आहे, त्याच्या फार्मवरून दररोज ८० ते १०० किलो टमाटे बाजारात विक्रीसाठी येत आहेत. रांचीच्या बाजारात धोनीच्या फार्मवरील भाजीपाल्याला फार मोठी डिमांड आहे.

धोनी रोजच आपल्या फार्मला भेट देऊन तपासणी करत असतो. फार्ममध्ये असलेल्या गायींसोबत वेळ घालवणे धोनी आणि त्याच्या परिवाराला फार आवडते. त्यांच्या डेअरीची देखरेख हि डॉक्टर विश्वरंजन करतात.

धोनीच्या फार्ममध्ये भारतीय प्रजातीची सहिवाल आणि फ्रान्सच्या प्रजातीची फ्रिजीयन मिळून ७० गायी आहेत, त्यांच्यापासून रोज ३०० लिटर दुध काढले जाते. फार्म वर असलेल्या गायीचे दुध ५५ रु लिटर प्रमाणे विकल्या जाते.

याबद्दल बोलताना डॉक्टर विश्वरंजन म्हणतात कि, ज्याप्रकारे फार्मवर शेती केली जात आहे त्यावर धोनी खूप खुश आहे. भाजी, फळे आणि दुध विकून जे काही पैसे येतात ते धोनीच्या बँक अकाऊंटवर टाकले जातात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here