आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारतीय नौसेना दिवस दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवशी नौसेनेतील अनेक पराक्रमी वीर योद्ध्यांना सन्मान दिल्या जातो. (INDIAN NAVY DAY) भारतीय नौसेना दिवस हा १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी साजरा करतात.

पाकिस्तानी सेनेने ३ डिसेंबरला भारतीय वायुमार्ग सीमेत आणि सीमावर्ती भागात हल्ला केला होता. या हल्यामुळे १९७१ च्या युद्धाची सुरुवात झाली होती आणि पाकिस्तानी सेनेला सडेतोड उत्तर देण्यासाठी  भारताकडून ‘ऑपरेशन ट्राइडेंट’ राबवण्यात आले होते.

भारतीय नौसेना

new google

‘ऑपरेशन ट्राइडेंट’ हे पाकिस्तानी नौसेनेच्या कराची स्थित मुख्यालयाला टार्गेट करण्यासाठी राबवण्यात आले होते. भारतीय नौसेनेच्या एक क्षेपणास्त्र नौका आणि दोन युद्धनौका यांचा समावेश असलेल्या एका समूहाने कराचीच्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या सलेल्या पाकिस्तानी नौकांवर हल्ला चढवला.

या युद्धात प्रथमच जहाजावर अँटी-शिप मिसाईलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक जहाजे नष्ट झाली आणि पाकिस्तानी नौसेनेचे अनेक तेल टँकरही उद्ध्वस्त झाले होते.

भारतीय नौसेनेचा शक्तिशाली हल्ला.

 

भारतीय नौसेनेने केलेल्या हल्याने कराची हार्बर फ्युल स्टोरेज पूर्णतः उद्वस्त झाले होते , यामुळे पाकिस्तानी नौसेनेचे तर कंबरडेच मोडले होते. या हल्ल्याची भीषणता यावरून लावली जाऊ शकते कि, कराची येथील तेल टँकराना लागलेली आग हि ६० किमी दूरवरूनही दिसत होती आणि हि आग आटोक्यात आणण्यासाठी पाकिस्तानला सलग ७ दिवस मेहनत करावी लागली होती.

नौसेना दिवस (INDAIN NAVY DAY) ४ डिसेंबरला साजरा करण्याचे कारण.

भारतीय नौसेना

 

नौसेना दिवस हा १९७१ च्या युद्धात विजय मिळवण्यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या बहादुरांना मानवंदना देण्यासाठी साजरा केला जातो. ४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या कारवाईचे यश लक्षात घेऊन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा केला जातो.

भारतीय नौसेनेचा इतिहास.

 

भारतीय नौसेना हि भारतीय सैन्याचाच एक सागरी भाग आहे, नौसेनेची स्थापना १६६२ मध्ये झाली होती. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी East India Company’s Marine या नावाने नौसेना स्थापन केली होती. काही कालांतराने याचे नामांतर रॉयल इंडियन नौसेना या नावाने झाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर परत एकदा १९५० मध्ये नौसेनेची स्थापना करून तिला भारतीय नौसेना नाव देण्यात आले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here