आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मध खाताय तर सावधान! तुम्ही खात असलेल्या मधात असू शकते 77 टक्के चायनीज शुगर सिरप…!

देशातील अनेक लहान मोठ्या ब्रॅण्डच्या मधात भेसळ होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बऱ्याच कंपन्या ह्या त्यांच्या मधात चाइनीज शुगर सिरपची भेसळ करत आहे असे सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (सीएसई) ला आढळून आले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट ने १३ कंपन्यांच्या मधाची तपासणी केली आहे, यातील 77 टक्के कंपन्याच्या मधात भेसळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मध

सीएसईने गुजरातच्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एनडीडीबी) च्या सेंटर फॉर एनालिसिस एंड लर्निग इन लाइवस्टॉक एंड फूड (सीएएलएफ) येथे सर्व मधांच्या नमुन्यांची चाचणी केली असता येथे सर्व मोठ्या कंपन्यांचे नमुने पास झाले तर काही लहान कंपन्यांचे नमुने हे फेल झाले.

new google

परंतु जेंव्हा हे सर्व नमुने जर्मनी स्थित प्रयोगशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या न्यूक्लियर मैग्नेटिक रेजोनेंस (एनएमआर) तपासणीसाठी पाठवण्यात आले तेंव्हा बहुतेक सर्वच मोठ्या ब्रॅण्डचे मधाचे नमुने हे फेल झाले आहेत.

१३ मधील केवळ ३ मधाचे नमुने तपासणीत पास.

 

जर्मनीच्या प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या परीक्षणात समाविष्ठ असलेल्या 13 ब्रँडपैकी केवळ तीन ब्रँडच येथे पास झाले आहेत. सीईएसईचे महासंचालक सुनीता नारायण यांनी बुधवारी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरला सांगितले की, मधाची शुद्धता तपासण्यासाठी ठरवण्यात आलेल्या भारतीय मानदंडानुसार ही भेसळ पकडली जाऊ शकत नाही कारण, चायनीज
कंपन्या आता अशा प्रकारचे शुगर सिरप बनवत आहेत जे भारतीय मानके सहजपणे पास होतात.

मध

सीएसईच्यानुसार चीनमध्ये असे अनेक बिजनेस वेब पोर्टल आहेत जे, तपासणीत न पकडल्या जाणाऱ्या शुगर सिरपच्या विक्रीचा दावा करतात. आता तर असे दावे करणाऱ्या कंपन्या त्यांचे उत्पादने भारतातही निर्यात करत आहेत.

याच दरम्यान पतंजली आणि डाबर या कंपन्यांनी सीएसईच्या या दाव्याचे खंडन केले आहे. या कंपन्यांचे म्हणणे आहे कि, त्या स्वतः नैसर्गिक पद्धतीने मध गोळा करतात. हा केवळ आणि केवळ त्यांच्या ब्रँडच्या प्रतिमेला कलंकित करण्याचा प्रयत्न आहे.

फ्रक्टोजच्या स्वरुपात भारतात आणल्या जातोय मधात मिसळल्या जाणारा शुगर सिरप.

गेल्या वर्षी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएएआय) ने आयातदार आणि राज्य अन्न आयुक्तांना माहिती दिली कि, देशात आयात होणाऱ्या गोल्डन सिरप, इन्वर्ट शुगर सिरप आणि राइस सिरपचा वापर हा मधात भेसळ करण्यासाठी केला जात आहे.

सीएसईच्या पथकाने या प्रकरणाची तपासणी केली असता त्यांना असे आढळून आले कि (एफएसएसएएआय) ने ज्या वस्तूंची भेसळ केली जात असल्याचे सांगितले आहे त्या तर आयत केल्या जात नाहीत. चीनच्या कंपन्या फ्रक्टोजच्या स्वरुपात हे सर्व शुगर सिरप भारतात पाठवत आहेत. या व्यवसायात एका कोड वर्डचा वापर केल्या जातो. चीनसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे आता ह्या कंपन्या त्यांचे उत्पादने हांगकांगच्या मार्गाने भारतात पाठवत आहेत.

चीनी कंपनीची कबुली.

मध

सुनीता नारायण म्हणाल्या की, चीनच्या शुगर सिरपचे सत्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या संस्थेने एक गुप्त ऑपरेशन केले आहे. या ऑपरेशन दरम्यान चीनच्या एका कंपनीने मान्य केले कि, मधात त्यांच्या सिरपची ५०ते ८० टक्के भेसळ केली तरी सुद्धा तो मध सर्व चाचण्या पास करेल. एका कंपनीने तर अशाच प्रकारचे सिरप एका टोपण नावाने संस्थेला पाठवले आहेत.

मधात केली जाणारी भेसळ थांबवण्यासाठी ठोक पाऊल उचलण्याची गरज.

हे सर्व प्रकार बघता १ ऑगस्ट २०२० पासून आयात केल्या जाणाऱ्या मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी एनएमआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु हि चाचणी करणारी मशीन अद्याप केवळ पुण्यातच बसवण्यात आली आहे. भेसळीचा हा खेळ रोखण्यासाठी एनएमआर तपासणी अधिक प्रभावीपणे अवलंबण्याची गरज आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here