आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

कधी सेल्समन असलेला विजय सेतुपती आज तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा राजा बनलाय..!


विजय सेतुपती आज तमिळ चित्रपट जगतातील एक सर्वात व्यस्त अभिनेता म्हणून ओळखल्या जातो. आपल्या जीवनात प्रत्येकालाच यश मिळत नाही, परंतु आपले काम पूर्ण इमानदारीने केल्यास कोणतीही गोष्ठ अशक्य नाही हे विजय सेतुपतीने दाखवून दिले आहे. आजच्या लेखात जाणून घेऊया विजय सेतुपतीच्या खडतर प्रवासाबद्दल…

युट्युबवर विजय सेतुपतीचे अनेक चित्रपट आहेत, या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद हाच विजयच्या सफलतेचे वर्णन करतो. विजय त्या ठराविक अभिनेत्यांमध्ये मोडला जातो, ज्यांच्यासाठी कोणतीही भूमिका निभावणे हि एक सहज गोष्ठ आहे.

 

new google

विजय सेतुपती

 

तमिळ फिल्म इंडस्ट्रीजमध्ये असे खूपच कमी सिनेकलाकार आहेत ज्यांनी कोणत्याही सपोर्ट शिवाय यशाचे शिखर गाठले आहे, त्यात विजय सेतुपतीचे नावही सामील आहे. विजयने त्याच्या सुरुवाती काळात सेल्समन, कॅशीअर आणि टेलिफोन बूथ ऑपरेटर म्हणून काम केले होते.

परिवाराची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि घरी ३ भावंडे असल्यामुळे विजय हा कामासाठी दुबईला गेला होता. दुबईत २ वर्ष अकाऊंटंट म्हणून काम केल्यावर विजयच्या डोक्यात विचार आला, कि आपण याव्यतिरिक्त दुसऱ्या क्षेत्रातही चांगले काम करू शकतो आणि मग तो थेट भारतात परतला.

कधी सेल्समन असलेला विजय सेतुपती आज तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा राजा बनलाय..!

विजयला पूर्वीपासूनच चित्रपटाची आवड होती त्याने दुबईहून परत आल्यावर काही दिवस चित्रपटग्रहात अकाऊंटंट म्हणून काम केले. विजयने इथे अनेक कामे केली आणि आता त्याने ठरवले कि आपणही अभिनयात करिअर बनवले पाहिजे, कारण त्याला बालू महेंद्र यांनी सल्ला दिला होता,

” तुझा चेहरा हा फोटोजेनिक आहे आणि तू चित्रपटात नक्कीच नाव कमावशील”

आणि याच सल्ल्याने त्याचे जीवनच पालटून टाकले. अभिनयाचे क्लासेस केल्यानंतर काही दिवसांनी त्याला चित्रपटात लहान मोठ्या भूमिका मिळण्यास सुरुवात झाली.

विजय सेतुपती

मिडिया रिपोर्टनुसार, विजयने त्याच्या करिअरची सुरुवात एक पार्श्वभूमी अभिनेता म्हणून केली होती. हळूहळू या छोट्या छोट्या भूमिकांमुमुळेच त्याची एक विशिष्ठ ओळख निर्माण झाली.

परंतु २०१२ वर्ष हे विजयसाठी सफलतेचे वर्ष होते, याचवर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘पिझ्झा’ आणि ‘नाडूवुला कुंज पक्कता कानोम’या चित्रपटांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहचवले होते.

‘पिझ्झा’ मध्ये विजयने एका डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली होती. तर ‘नाडूवुला कुंज पक्कता कानोम’ मध्ये त्याने एका तरूणाची भूमिका केली होती ज्याची लग्नाच्या केवळ २ दिवस पहिले मेमरी(आठवण) मिटते. विजयने साकारलेल्या या दोन्हीही भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटामुळे त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

२०१२ नंतर विजयने अनेक चित्रपटांत काम केले ज्यापैकी बहुतांश चित्रपट हे सुपरहिट होते. ज्यामध्ये Soodhu Kavvum, Pannaiyarum Padminiyum, Orange Mittai, Dharma Durai, Vikram Vedha, Super Deluxe, ’96 हे चित्रपट सामील आहेत. विक्रम वेधा आणि ९६ या चित्रपटांनी तर अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here