आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सर्वात श्रीमंत महिलेबद्दल वाचा सविस्तर….!

 

‘कोटक वेल्थ हुरुन इंडिया’ ने २०२० मधिल भारतातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची यादी प्रसिध्द केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीची चेयरपर्सन रोशनी नडार मल्होत्रा हि भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे.

रोशनी नडार मल्होत्रा यांची एकूण संपती ५४८५० कोटी एव्हढी आहे. त्यांच्यापाठोपाठ बायोकॉन कंपनीच्या किरण मजुमदार शॉ ह्या ३६६०० कोटीच्या संपतीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

new google

 

कोण आहे रोशनी नडार मल्होत्रा?

श्रीमंत महिला-रोशनी नडार मल्होत्रा
image source- toi

रोशनी नडार मल्होत्रा ह्या एचसीएल कॉर्पोरेशन मध्ये एग्जीक्युटिव डायरेक्टर आणि सीईओ पदावर विराजमान आहेत. या व्यतिरिक्त रोशनी नडार मल्होत्रा एचसीएल टेक्नोलॉजीज बोर्डाच्या वाइस चेयरपर्सन आणि शिव नडार फाउंडेशनच्या ट्रस्टी सुद्धा राहिलेल्या आहेत.

३८ वर्षीय रोशनी नडार एचसीएलचे संस्थापक आणि चेअरपर्सन शिव नडार यांची मुलगी आहे. या वर्षी जुलैमध्ये आयटी क्षेत्रातील अव्वल कंपनी एचसीएल कंपनीचे चेअरपर्सन शिव नडार यांनी आपले पद सोडून सर्व जबाबदाऱ्या आपली मुलगी रोशनी नडार मल्होत्रा यांना सोपवल्या आहेत.

 

रोशनी नडार यांचे खासगी जीवन.

२८ वर्षाची असताना कंपनीची सीईओ बनलेल्या रोशनी नडार यांचा जन्म आणि पालन पोषण हे दिल्लीमध्येच झाले आहे. त्यांनी आपले सुरुवाती शिक्षण हे दिल्लीच्या वसंत वैली स्कूल येथून पूर्ण केले आहे.

अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी येथून त्यांनी ग्रेजुएशन केले, आणि याच यूनिवर्सिटीच्या केल्लोग स्कूल ऑफ मैनेजमेंटमधून तिने एमबीएची डिग्री मिळवली.

श्रीमंत महिला-रोशनी नडार मल्होत्रा
image source-wikibio

२००९ मध्ये एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये रुजू होण्यापूर्वी रोशनीने स्काई न्यूज यूके आणि सीएनएन अमेरिका यांच्यासमवेत वृत्त निर्माता म्हणूनही काम केले आहे. २०१० मध्ये त्यांनी एचसीएल हेल्थकेअरचे व्हाईस चेअरमन शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केले आहे. या जोडप्याला अरमान आणि जहान नावाचे दोन अपत्यही आहेत.

 

फोर्ब्सच्या १०० शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये सामील होण्याचा सन्मान.

वन्यजीव आणि संवर्धनाची आवड असणारी रोशनी नडार मल्होत्रा ​​यांनी २०१८ मध्ये हॅविट्स ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टचा मुख्य उद्देश देशातील नैसर्गिक ठिकाणे आणि स्वदेशी वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे हा आहे.

रोशनी नडार मल्होत्रा ह्या २०१९ मध्ये फोर्ब्सच्या “ द् वर्ल्ड्स मोस्ट पॉवरफुल वुमेन” च्या यादीमध्ये ५४ व्या क्रमांकावर होत्या. या यादीमध्ये लगातार २०१७ ते २०१९ पर्यंत त्यांचे नाव आलेले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here