आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

नवीन संसद भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते….

भारताच्या नवीन संसद भवनाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत, हि नवीन इमारत त्रिकोणी आकाराची असून तिचे निर्माण हे जुन्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. नवीन संसद भवनाचे बांधकाम हे टाटा प्रोजेक्ट लिमिटेडद्वारा केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० डिसेंबर रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन करणार आहेत.

अशी असेल संसदभवनाची नवीन इमारत.

संसद भवन

 

नवीन इमारतीमध्ये एक मोठा कॉस्टीट्यूशन हॉल बनवल्या जाणार आहे, ज्यामध्ये भारतीय लोकशाहीच्या वारशाची झलक पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त सदस्यांसाठी लॉन्ज, तसेच संसदेतील समित्यांसाठी खोल्या, अद्यावत भोजनाची सुविधा आणि त्यांच्यासाठी पार्किंगची पुरेशी जागा असेल.

काल दुपारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी येवून त्यांना संसद भवनाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्याचे निमंत्रण दिले आहे. प्रस्तावित इमारतीविषयी माहिती देताना बिर्ला म्हणाले, भारतीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणारी संसदेची इमारत १०० वर्ष पूर्ण करणार आहे.

संसद भवनाची नवीन इमारत हि आत्मनिर्भर भारताचे एक उत्कृष्ट उदाहरण. 

 

नवीन इमारतीचे निर्माणकार्य हे आपल्या देशातील लोकांकडून पूर्ण होणार आहे आणि हि प्रत्येक भारतीयासाठी सन्मानाची गोष्ठ आहे. हि इमारत ‘आत्मनिर्भर भारताचे एक उत्कृष्ट उदाहरण असेल. पुढे बोलताना ओम बिरला म्हणाले, ” संसद भवनाच्या नवीन इमारतीतून देशातील सांस्कृतिक विविधता प्रदर्शित होईल. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संसदेचे अधिवेशन हे नवीन इमारतीत आयोजित केल्या जाईल.”

संसदेची नवीन इमारत हि भूकंप विरोधी क्षमतेची असेल आणि या निर्माण कार्यात २००० लोकांचा प्रत्यक्ष आणि ९००० लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग राहणार आहे. नवीन संसद भवनात १२२४ खासदार एकत्र बसू शकतील आणि विद्यमान श्रम शक्ती भवन (संसद भवनाच्या जवळ) च्या जागी दोन्ही सभागृहातील खासदारांसाठी कार्यालय परिसर बनवण्यात येणार आहे. संसदेची सध्याची इमारत हि देशातील पुरातत्व मालमत्ता म्हणून जतन केली जाईल.

ओम बिरला यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमासाठी औपचारिक आमंत्रण दिले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाविषयी बोलताना ओम बिरला यांनी स्पष्ठ केले कि, नवीन इमारतीच्या बांधकामाशी संबंधित कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले जाईल. काही लोक प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असतील तर काही डिजिटल माध्यमातून सामील होतील. या कार्यक्रमात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जाईल.

संसदभवनाच्या नवीन इमारतीमध्ये होणार आहेत अनेक बदल.

संसद भवन

नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुरेश्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नवीन संसद भवनात प्रत्येक खासदारासाठी त्यांचे स्वतंत्र कार्यालये असतील, जी आधुनिक डिजिटल सुविधांनी सुसज्ज असतील आणि हे ‘पेपरलेस कार्यालय’ तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल. नवीन संसदेतील सभाग्रहात एका विशाल संविधान कक्षाची निर्मिती केली जाणार आहे, या कक्षात भारताच्या लोकशाहीची परंपरा प्रदर्शित केली जाणार आहे.

नवीन इमारतीच्या लोकसभा कक्षात ८८८ सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था असेल आणि राज्यसभा कक्षात ३८४ सदस्यांची व्यवस्था असेल. (भविष्यात दोन्ही सभासदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे केले जात आहे).

सध्या लोकसभेचे ५४३ आणि राज्यसभेचे २४५ सदस्य आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत ही नवीन इमारत सध्याच्या संसद भवनाजवळच बांधली जाणार आहे.

नवीन संसद भवनाच्या निर्माण कामासाठी सप्टेंबर महिन्यात टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने ८६१.९० कोटी रुपयांची बोली लावली होती. हि इमारत बनून तयार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. याच कामासाठी एल अँड टी या कंपनीने ८६५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here