आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

२०२१ मध्ये या राशीच्या व्यक्तींसाठी शनी महाराज खोलणार आहेत सुखशांती आणि समृद्धीचे द्वार, तर काहींसाठी ठरणार आहेत कर्दनकाळ!

 

सूर्यपुत्र शनिदेव यांना कर्मफळ दाता म्हणूनही ओळखले जाते. शनी महाराज जर प्रसन्न असतील तर सर्व गोष्ठी चांगल्या होतात आणि आपल्या प्रत्येक कामात यश मिळते. याउलट जर शनीची कुदृष्टी कोणावर पडली तर त्या व्यक्तीचे सर्व कामे बिघडू लागतात. शनीचे संक्रमण, शनीची साढेसाती आणि शनीची महादशा यांच्यामुळे जीवनात अनेक मोठे बदल होतात.

 

new google

2021

२०२१ मध्ये सर्वात चांगली गोष्ठ हि आहे कि, शनी आपली राशी बदलणार नाहीत. वर्षभर ते आपल्या स्वराशीत म्हणजेच मकर राशीत विराजमान राहणार आहेत. परंतु यावर्षी राशीच्या बदल्यात शनी महाराजांचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीला शनी हे उत्तराषाढा नक्षत्रात राहतील, ज्याचा स्वामी हा सूर्य ग्रह आहे आणि २२ जानेवारीला शनीचा श्रवण नक्षत्रात प्रवेश होणार आहे.

 

२०२१ मध्ये शनिदेव हे नक्षत्र परिवर्तनाच्या (Shani Nakshatra Transit 2021) आधारे लोकांना फळ देणार आहेत. २०२१ मध्ये मिथुन, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया २०२१ मध्ये कोण कोणत्या राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आहे आणि कोणत्या राशींच्या व्यक्तींना थोडीसी सावधगिरी बाळगावी लागणार आहे याबद्दल सविस्तर…

Shani 2021 Rashifal : 2021 मध्ये कोणत्या राशीवर शनीची वक्रदृष्टी, कुणाला करणार 'कंगाल' अन् कोण होणार 'मालामाल' ? | shani 2021 rashifal date saturn transit nakshatra parivartan effect on ...

 

मेष.

२०२१ मध्ये आपल्याला शनीच्या संक्रमणचे मिश्रित परिणाम पाहण्यास मिळतील. या काळात तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात खूप कष्ट करावे लागतील, परंतु तुम्हाला कष्टाचे फळ मिळेल. या काळातच आपल्या वाडीलाशी आपले नाते थोडे बिघडू शकते. तुम्हाला त्यांच्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागेल. काही कारणांमुळे आपल्या पारिवारिक जीवनात थोडासा दुरावा निर्माण होईल.

26 जानेवारी नंतर शनी हे चंद्राच्या श्रवण नक्षत्रात जाणार आहेत, आणि या काळात आपल्या वडिलासोबतचे नाते पूर्वीसारखे होईल, परंतु तुम्हाला याविषयी खास काळजी घ्यावी लागेल कारण, शनी चे संक्रमण हे तुमच्या वाडीलासाठी चांगले नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळणार आहे.

वृषभ.

वर्षाच्या सुरुवातीस शनी उत्तराषाढा नक्षत्रात असल्यामुळे आपणास पारिवारिक सुख मिळणार आहे. नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि कमाईचे काही नवीन स्त्रोत मिळणार आहेत. या राशीच्या व्यक्तींना विदेशात जायचे असेल तर त्यांनी याकाळातच प्रयत्न करावा कारण हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या भावंडांसाठी हा काळ चांगला नाही त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

मिथून.

शनिदेवाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात काही उतार चढाव येणार आहेत. काही कामांमध्ये अपयशी होऊन तुम्हाला मानसिक तणावही होऊ शकतो. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना गंभीर रोग होण्याची श्यक्यता आहे. पैश्यांच्या बाबतीत तुम्हाला सांभाळून राहावे लागेल अन्यथा धनहानी होऊ शकते. सासरच्या मंडळीशी सांभाळून राहावे नाहीतर नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो.

राशिफल 2021 - अपनी राशि के अनुसार जानें साल 2021 का भविष्यफल

कर्क.

२०२१ मध्ये आपणास आपल्या जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला त्यांची खास काळजी घ्यावी लागणार आहे. पारिवारिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अतीशय अनुकूल आहे. प्रेमींसाठी सुद्धा हा काळ चांगला जाणार आहे. अनेक दिवसांपासून असणारे सर्व मतभेद दूर होणार आहेत.

सिंह.

शनीच्या या संक्रमणाचा सर्वात जास्त प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडणार आहे त्यामुळे आपण सावधानता बाळगावी. यावर्षी तुम्ही तुमच्या विरोधकांवर दबाव निर्माण करू शकता. आपण जर बँकेकडून कोणत्याही प्रकारचे लोन अप्लाय केले असेल तर तेही याकाळातच मिळू शकते. यावर्षी तुमचा खर्च वाढणार आहे. विदेश यात्रा होण्याची शक्यता आहे. कोर्टात चालत असलेल्या प्रकरणांचा निकाल तुमच्या दिशेने लागणार आहे.

कन्या.

शनीच्या उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेशामुळे तुमच्या मुलाबाळाचे विदेशात जाण्याचे योग आहेत. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ शकतो. प्रेमींसाठी शनीचा हा गोचर चांगला आहे यामुळे तुमचा प्रेमविवाह होणेही शकय आहे. श्रावण नक्षत्रात शनीच्या प्रवेशाने तुमच्या कमाईत वृद्धी होणार आहे. अनेक मार्गाने धनप्राप्ती होणार आहे. या काळात सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना मेहनत करावी लागणार आहे.

तुला.

प्रॉपर्टीच्या क्षेत्रात शनिदेवच्या या संक्रमणातून तुम्हाला फायदा होऊ शकेल. आपण मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, या संक्रमण कालावधीत खरेदी करणे आपल्यासाठी चांगले असेल. आपले स्वतःचे घर बनवण्याचे आपले स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. समाजात आपला आदर सन्मान वाढेल. या काळात आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण तिला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृश्चिक.

Daily Hindi Rashifal (Horoscope) 2015. All Aries, Taurus, ...- Daily Hindi Rashifal (राशिफल) 2015.… in 2020 | Libra and pisces, Virgo and aquarius, Aquarius horoscope today

या वर्षीच्या शनि संक्रमणातून तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळून आनंदाचे वातावरण राहील. या परिवर्तनशील काळात घरातील सदस्यांशी जवळीक वाढणार आहे. या काळात होणाऱ्या यात्रांचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे आपल्या आईवडीलाची विशेष काळजी घ्या.

धनु.

२०२१ चे शनी संक्रमण धनू राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम देणार आहे. या काळात आपले कौटुंबिक वातावरण खूप चांगले असेल अशी अपेक्षा आहे. बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेली समस्या लवकरच संपू शकते. या वेळी कोणत्याही कारणास्तव आपल्याला कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. श्रवण नक्षत्रात शनिच्या आगमनानंतर तुमच्या आयुष्यात अचानक संपत्तीचे योग येतील. या काळात आपल्याला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ देखील मिळू शकेल.

मकर.

२०२१ च्या या संक्रमणामुळे आपल्या जीवनात चढउतारांची परिस्थिती असेल. शनिच्या उत्तराषाढ़ा नक्षत्राच्या भ्रमणामुळे तुम्हाला आपल्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्याचेही संकेत आहेत.
आरोग्याबद्दल जागरूक रहा अन्यथा एखादी मोठी आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामांना गती मिळू शकते. मकर राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातही चढउतार येतील.

कुंभ.

२०२१ मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आपल्या विवाहित जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. याशिवाय आरोग्याच्या बाबतीतही आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या दरम्यान आपल्या स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमचा आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल आहे.

मीन.

या राशीच्या व्यक्तींसाठी या काळात सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. आपण आपल्या विरोधकांवर विजय मिळविण्यास सक्षम असाल. मीन राशीच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला ठरणार आहे. याशिवाय स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here