आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

शेतकरी आंदोलन केवळ पंजाब आणि हरियाणा राज्यातच का तीव्र होत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर हा लेख अवश्य वाचा..!

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे कि फायदा? पंजाब आणि हरियाणा राज्यातीलच शेतकरी या कायद्यांचा विरोध कशासाठी करत आहेत? असेच अनेक प्रश्न सध्या अनेक लोकांना पडलेले आहेत, काही जनांना याविषयी थोडीफार माहिती आहे, परंतु काही जन केवळ दुसर्यांनी बोललेल्या गोष्ठींवर विश्वास ठेवत आहेत. हे सर्व प्रश्न दूर करण्यासाठी हा लेख केवळ वाचून चालणार नाही तर तुम्ही समजून घ्यायला हवा…!

 

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे कि, हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यातील शेतकरीच का आंदोलन करत आहेत? काहींना वाटते केवळ या दोन राज्यातील शेतकऱ्यांनाच या कायद्यांनी नुकसान पोहोचणार आहे. हे सर्व व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जेवणाची थाळी आणि सरकाद्वारा खरेदी केल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गहू यांच्या आकड्यांना समजून घेतले पाहिजे.

पंजाब
पंजाब हरियाणातील शेतकरी आंदोलन करताना

आपल्या रोजच्या जेवणात काय असते? चपाती, भात, आणि भाजी पंजाब आणि हरियाणा राज्यात तेथील लोकं भात अतिशय कमी प्रमाणात खातात, परंतु त्यांच्याद्वारे काढल्या जाणारे तांदुळाचे उत्पन्न हे आपल्या देशात सर्वात जास्त आहे.
याठिकाणी झालेले तांदूळ हे देशातील सर्व ठीकाणी खाल्ले जातात. धान्याचे कोठार म्हणाल्या जाणारे पंजाब आणि हरियाणा हे राज्य देशातील खाद्य सुरक्षेच्या दृष्ठीने प्रमुख स्त्रोत आहेत.

 

पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य संपूर्ण देश खातो असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. दोन्ही राज्यातील लोकांसाठी कमाईचे प्रमुख साधन आहे शेती, अर्थातच तांदूळ आणि गहू. हे तांदूळ आणि गहू सरकारी भावात (MSP) विकले जातात. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे या दोन्ही राज्यात सुरु असलेल्या पूर्ण सिस्टीम वरच महासंकट दिसत आहे. आणि यामुळेच या दोन राज्यातील शेतकरी हे आंदोलन करत आहेत.

 

शेतकरी आंदोलनाच्या ठीक एक दिवस पहिले देशाच्या उपभोगता मामले आणि खाद्य आणि सार्वजनिक वितरण (भारत सरकार) मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करून माहिती दिली होती, त्यानुसार सरकारने ६ डिसेंबर पर्यंत देशात ३४४.८६ मेट्रिक टन धानाची खरेदी केली आहे. हा आकडा मागील वर्षापेक्षा २२ टक्क्यांनी जास्त आहे. या खरेदीसाठी देशातील ३५ लाख शेतकऱ्यांना ६५.१११ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामधील ५९ टक्के योगदान हे केवळ पंजाब राज्याचे आहे.

शेतकरी ज्यामुळे आंदोलन करत आहेत ती MSP काय आहे?

MSP म्हणजे तो भाव आहे जो दरवर्षी २३ पिकांसाठी रब्बी आणि खरीप हंगामासाठी केंद्र सरकार ठरवते. यावेळी धान (तांदूळ) ची MSP हि चांगल्या प्रतीच्या धानासाठी १८८८ आणि मध्यम प्रतीच्या धानासाठी १८६८ रुपये प्रती क्विंटल ठरवण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणि भारतातील कृषी संकटासाठी MSP हे सर्वात मोठे कारण आहे.

 

शेतकरी आंदोलनात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी जास्त प्रमाणात का? याविषयी बोलताना खाद्य आणि निर्यात तज्ञ देविंदर शर्मा हे एका प्रसार माध्यमाला सांगतात, सरकारी माहितीनुसार देशातील ६ टक्के शेतकऱ्यांनाच MSP मिळते आणि ९४ टक्के यापासून वंचित राहतात.

 

 

ह्या ६ टक्के शेतकऱ्यांमध्ये पंजाब आणि हरियाणाचे शेतकरीच जास्त प्रमाणात आहेत. पंजाब मध्ये ९७ टक्के धानाची आणि ७५-८० टक्के गव्हाची खरेदी हि सरकार द्वारे केली जाते. बिहार मध्ये १ टक्के आणि राजस्थानमध्ये जवळपास ४ टक्के आणि उत्तर प्रदेशात ७ टक्क्यांपेक्षा कमी खरीददारी होते.

 

शरद पवार हे कृषिमंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये सागितले होते, देशातील ७१ टक्के लोकांना माहीतच नाही कि MSP नेमके काय आहे. ज्यांना याबद्दल माहितीच नाही त्यांना याचा फायदा नाही मिळाला तर मग ते संघर्ष कशासाठी करणार? हे ७१ टक्के शेतकरी खुल्या बाजारपेठेच्या आशीर्वादाने आपले काम धाकवत आहेत. जर सरकारने बाजारपेठेत आपले जाळे विस्तारले असते तर सर्व शेतकऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली असती आणि सोबतच याचा फायदाही मिळाला असता.

 

बाहेरच्या राज्यातून आलेले धान थांबवण्यासाठी आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी हरियाणा सरकारने “मेरा फासल मेरा ब्योरा” हे SOFTWARE बनवले आहे. यानुसार हरियाणामध्ये धान विक्रीसाठी जमिनीचे कागदपत्रे दाखवणे अनिवार्य होते. यामुळे बाहेर राज्यातील लोक राज्यात येऊन त्यांचा माल विकू शकत नाहीत. परंतु पंजाब मध्ये अशी कोणतीही सुविधा नाही, यामुळेच बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक ट्रक पंजाब मध्ये पकडले गेले आहेत. पंजाब मध्ये आजपर्यंत ९५ तक्रारी ट्रक आणि ट्रक्टरविरोधात नोंदवण्यात आल्या आहेत.

 

कृषी कायद्याचा विरोध तर सर्वच राज्यात आहे परंतु पंजाब आणि हरियाना हे दिल्लीच्या जास्त जवळ आहेत आणि याच दोन्ही राज्यात MSP च्या आधारे खरेदी सर्वात जास्त प्रमाणात केली जाते. हे दोन्ही राज्य आकाराने खूप लहान असले तरीही यांच्यावरच संपूर्ण देशाच्या खाद्य सुरक्षेचा जिम्मा आहे. गरिबांना पोहोचवण्यात येणाऱ्या अन्नधान्याचा ( राशनचा ) सर्वात मोठा भाग हा याच राज्यांतून खरेदी केला जातो.

पंजाब

 

येथेही MSP च्या नावावर आहे केवळ गहू आणि तांदूळ. मक्का तर येथेही १८०० रुपये किमतीची १२०० मध्ये विकल्या जात आहे. या शेतकऱ्यांना सर्वात मोठी भीती आहे कि, येथे होणारी खरेदी जर बंद झाली तर ते काय करतील? पंजाबचे शेतकरी हे शेतामध्ये भरपूर पैसा गुंतवतात, नवीन कृषी कायद्यांमुळे आता त्यांना बाजारपेठ आणि MSP या दोन्हींवरही धोका दिसत आहे.

 

पंजाब, हरियाणा आणि बाकी राज्यातील जमिनीमध्ये खूप अंतर आहे. हरित क्रांती हि पंजाब आणि हरियाणा येथे झाली आणि याठिकाणी सघन शेती करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र विषयी बोलायचे झाले तर, पश्चिम महाराष्ट्रात उसाचे उत्पन्न जास्त होते, पुणे, नाशिक परिसरात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पन्न जास्त प्रमाणात होते, मराठवाड्यात ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन आणि विदर्भात कापूस आणि संत्र यांचे उत्पन्न घेतले जाते.

 

केरळ मध्ये सुपारी, नारळ, काळी मिर्च आणि दुसरे मसाले यांचे उत्पन्न घेतले जाते. असेच बाकी राज्यातही तेथील स्थानिक कॅश क्रॉप आहेत ज्यांचा बाजारपेठेशी आणि MSP याच्याशी काहीही संबंध नाही. परंतु पंजाब आणि हरियाना मध्ये गहू आणि धान यांचे उत्पन्न घेतले जाते आणि हे बाजारपेठेवर अवलंबून आहेत.

 

दुसरे राज्य आणि पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्याच्या विरोधाबद्दल बोलायचे झाले तर, ज्याठिकाणी जास्त बाजारपेठा असतील त्या ठिकाणी कमाई पण जास्तच होणार. याचे उदाहरण घ्यायचे झाले तर पंजाब आणि बिहारचे उत्पन्न बघू शकता. शेतकऱ्याच्या आंदोलन करण्याची गोष्ठ घेतली तर, जो शेतकरी खाली पोट झोपेल तो आंदोलन काय करणार? कारण त्यांना संध्याकाळच्या जेवणाचीच काळजी असते.

 

हरियाना आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचे अर्धे पोट भरलेले आहे आणि अर्धे पोट रिकामे. येथील शेतकऱ्यांमध्ये लढण्याची हिम्मत आहे म्हणूनच ते आंदोलन लढत आहेत. अनेक राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या नियमांनी मजबूर बनवले आहे आणि असा शेतकरी आंदोलन आणि लढाई काय लढणार?

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here