आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारत बंदला देशभरात कसा पाठींबा मिळतोय?

केंद्रसरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्वत्र संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात अद्याप कुठेही वाईट घटना घडलेली नाही.

काही ठिकाणी जाम मध्ये फसलेल्या लोकांना स्वतः शेतकरीच मदत करत असताना दिसत आहेत, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कि आमचे आंदोलन हे शांतीपूर्वक आहे. त्यामुळे कोणासही हानी पोहोचणार नाही याची शेतकरी काळजी घेत आहेत. बघूया देशात कुठे कुठे आणि कसा प्रतिसाद मिळतोय बळीराजाच्या या आंदोलनाला…

महाराष्ट्रात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद.

भारत बंद

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भारत बंदचे समर्थन होत आहे. सर्व कृषी उत्पन्न बाजारसामित्या आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीस आणण्यासाठी मनाई केली आहे.

मुंबईत सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु ठेवण्यात आली आहे. मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकलसेवा, बेस्टच्या बस फेऱ्या, रिक्षा ह्या सर्व आवशक सुविधा सुरु असल्यामुळे सर्वसाधारण मुंबईकरांना काही परिणाम होणार नाही. परंतु काही संवेदनशील भागात बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यातील सर्व बँकांचे कामकाजही सुरु राहणार आहे. मुंबईतील डब्बेवाल्यांनी भारत बंदला पाठींबा दर्शवला आहे याबद्दलची घोषणा संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला ठाण्यातही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात ठाण्यात ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा पाठींबा करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र भारत बंदला मिळणारा प्रतिसाद बघून कोल्हापूरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले आहे. संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या संमार्थनात सर्व जनता उतरली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला रायगड जिल्ह्यात फार काही प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्ह्यात सकाळपासूनच सर्वत्र भाजी विक्रेते आणि इतर प्रकारचे दुकानही उघडल्याचे दिसत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असणाऱ्या अलिबाग शहरातही सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. राज्य परिवहनाची सेवाही या ठिकाणी सुरु ठेवण्यात आली आहे.

भारत बंदमुळे दिल्लीवाशियांच्या अडचणी वाढल्या.

 

भारत बंदमुळे दिल्लीवाशीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, दिल्लीच्या टिकरी, झौदा, धनसा ह्या सीमा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही ठराविक वाहनाच्या आवाजाई साठी बडूसराय सीमा खुली ठेवण्यात आली आहे. केवळ दुचाकी वाहनांसाठी झटिकारा सीमा वापरण्यात येत आहे. दिल्लीतून हरियाना  राज्यात जाण्यासाठी दौराळा, कापशेरा या सीमा उघडण्यात आल्या आहेत.

भारत बंद

देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्रसरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंद आंदोलन केले आहे. या दरम्यान आम आदमी पार्टीने दिल्ली पोलिसांवर खूप मोठा आरोप केला आहे. त्यांच्यानुसार दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना शेतकऱ्यांना भेटू दिले नाही.

हरियाणात अनेक ठिकाणी रस्ता रोको. 

 

हरियाणा राज्यात अनेक महामार्गांवर धरने आंदोलन करणाऱ्या लोकांचे समूह पाहण्यास मिळत आहेत, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. नारनौल आणि नूह वगळता सर्च जिल्यात आणि महामार्गांवर वाहतूक ठप्प होण्याची दाट शंका वर्तवण्यात येत आहे.

शेतकर्यांनी पुकारलेल्या भारत बंदला १८ विरोधी पक्षांनी पाठींबा दर्शवला आहे. तर सरकारचे म्हणणे आहे कि २० शेतकरी संघटनांनी सरकारला पाठींबा दिला आहे. पंजाबमध्ये तर काही शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला पाठींबा दिला आहे.

याव्यतिरिक्त पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यातही भारत बंदला चांगला पाठींबा मिळत आहे. बिहारमध्ये  तर बऱ्याच ठिकाणी बस आणि खासगी वाहने बंद ठेवण्यात आली आहेत. छत्तीसगड आणि पंजाबच्या काही भागात तर नाकाबंदी लावण्यात आली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here