आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मुकेश अंबानी यांनी केली हि मोठी घोषणा..

टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वांत वरच्या स्थानी असलेल्या रिलायन्स जिओने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. मोबाईल कॉन्फेरेंस २०२० मध्ये बोलत असतांना रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लवकरच रिलायन्स भारतात 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

 

“इंडिया मोबाईल कॉन्फरन्स” कार्यक्रमाला संभोदित करत असतांना त्यांनी म्हटले आहे कि,रिलायस जिओ जून २०२१ पर्यंत 5G सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे.अस असले तरी त्यासाठी लागणारी प्रक्रियामध्ये कामाला गती देणे अत्यावश्यक आहे. त्यांनी म्हटले आहे कि, जोपर्यंत या कामाला गती दिली जाणार नाही तोपर्यंत हि सेवा सर्वांपर्यंत लवकरात लवकर पोहचवणे  एक मोठे आव्हान असणार आहे.

मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे कि, २०२१ मध्ये जिओ 5G घेऊन येणार आहे. त्यासाठी वापरण्यात येनारे संपूर्ण हार्डवेअर आणि टेक्नोलॉजी हि संपूर्णपाने स्वदेशी असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे जीओचे पाऊल असेल.

 

भारताने 5G स्पेक्टमच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा.

 

सोबतच अंबानी यांनी हे सुद्धा म्हटले आहे कि, रिलायन्स जिओ हाच भारतात 5G क्रांतीला लीड करेल.
भारत येणाऱ्या दिवसात सेमी कन्डक्टरचा मैन्युफैक्चरिंग हब बनला जाऊ शकतो. आपण सेमी कन्डक्टर साठी केवळ
आयातच्या भरोश्यावर अवलंबून नाही राहू शकत.

 

देशात अजूनही आहेत ३० करोड 2G वापरकर्ते..!

 

मुकेश अंबानी यांनी देशात आजसुद्धा 2G वापरकर्त्यांची संख्या हि देशात ३० करोड लोकांपेक्षाही जास्त असल्याच म्हटल आहे. या सर्वांना येत्या काळात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून 4G/5G मध्ये  व्यक्तिगतरित्या सहभागी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here