आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

विचित्र प्रयोग करण्यात हातखंडा असलेल्या चीनने आता चक्क सुर्याचीच कॉपी मारलीय..!


चीनचे लोक काय नवा पराक्रम करतील याचा काही नेम नाही. यातच आता अशी बातमी समोर आली आहे कि, चीनच्या शास्त्रज्ञांनी चक्क कृतीम सूर्य बनवला आहे आणि तोही असली सूर्यापेक्षा दहा पट शक्तिशाली. हा सूर्य म्हणजे एक परमाणु फ्युजन (nuclear fusion)आहे, आणि यातून खऱ्या सूर्यापेक्षा अधिक उर्जा मिळणार आहे.

कृतीम सूर्य

चीनच्या अधिकृत माध्यमांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत माहिती दिली आहे. कृतीम सूर्य बनवण्याचा हा प्रोजेक्ट मागील अनेक वर्षांपासून सुरु होता. या प्रकल्पाच्या यशाने चीनला आता विज्ञान जगतात त्या ठिकाणी नेऊन सोडले आहे, ज्याठिकाणी सध्या अमेरिका, जपानसारखे तंत्रज्ञानाने प्रगत देश देखील पोहचू शकलेले नाहीत.

new google

चीनने या प्रकल्पाची सुरुवात २००६ मध्ये केली होती. शास्त्रज्ञांनी बनवलेल्या या कृतीम सूर्याला HL-2M हे नाव देण्यात आले आहे. या सूर्याची निर्मिती चाइना नेशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशन (China National Nuclear Corporation)
आणि साउथवेस्टर्न इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्स येथील शास्त्रज्ञांनी मिळून केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्रतिकूल परिस्थितीही सौर उर्जेला बनवण्याचा होता. कृतीम सूर्याचा प्रकाश हा खऱ्या सूर्यासारखाच असणार आहे.

चीन

कृतीम सूर्याची कार्यप्रणाली.

कृतीम सूर्याच्या कार्यप्रणालीमध्ये एका शक्तिशाली चुंबकीय क्षेत्राचा उपयोग केला जातो. हा सूर्य १५ कोटी डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान निर्माण करू शकणार आहे. ( हे तापमान सूर्याच्या तुलनेत दहा पट अधिक आहे ) खर्या सूर्याचे तापमान हे १.५ कोटी डिग्री सेल्सियस असते. पृथ्वीवर असलेल्या अणुभट्ट्यांमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विखंडन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. अणु संलयन प्रत्यक्षात खऱ्या सूर्यावरच होते, आणि याच संकल्पनेवर चीनचा HL-2M हा प्रकल्प आधारित आहे.

कृतीम सूर्य लावणार चीनच्या अर्थव्यवस्थेला मजबूत हातभार.

कृतीम सूर्य

दक्षिण-पश्चिमी सिचुआन प्रांतात स्थित असलेल्या अणुभट्टीलाच कृतीम सूर्य म्हटले जाते. याठिकाणीच खऱ्या सूर्यासारखी उष्णता आणि वीज निर्माण केली जाते. चीनमधील पीपल्स डेलीच्या नुसार, न्यूक्लियर फ्यूजन एनर्जीचा उपयोग हा विकसित चीनच्या सामरिक उर्जा गरजा भागविण्यासह चीनची उर्जा आणि अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासास मदत करेल

कृतीम सूर्य बनवण्यासाठी २२.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक.

अनु संलयन मिळवणे हि अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. या प्रकल्पाची ITER ची एकून गुंतवणूक हि २२.५ बिलियन डॉलर एव्हढी आहे. आजपर्यंत जगातील अनेक देशांनी असाच कृतीम सूर्य बनवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सर्वात मोठी अडचण ही उष्ण प्लाझ्माला एकाच ठिकाणी आणि फ्यूजन पर्यंत त्याच स्थितीत ठेवणे हि आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here