आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

विदुरनीतीनुसार या ३ प्रकारच्या लोकांना कधीच तुमचे रहस्य सांगू नका, भूगतावे लागतील गंभीर परिणाम.!

 

विदुरनीति म्हणजे महाभारतातील महात्मा विदुर यांनी सांगीतलेले काही नियम, ज्यांना आत्मसात केल्यामुळे आपल्या रोजच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील. तसे तर आपल्या सर्वांना चाणक्यनीति बद्दल माहिती असेलच परंतु काही लोकांना विदुरनीति बद्दल माहिती नाही. महात्मा विदुर हे अतिशय बुद्धिमान आणि चाणाक्ष होते. त्यांच्या या गुणांमुळेच महाराज धृतराष्ट्र हे अनेक गंभीर मुद्यांवर त्यांच्यासमवेत चर्चा करत.

 

new google

महाभारतात या गोष्ठींचा अनेक जागी पुरावा आहे कि, महाराज धृतराष्ट्र हे अनेकवेळा त्यांच्या पुत्रांच्या विरोधात जाऊन विदुर यांच्याकडून सल्ले घेत असत. महाभारतातील पांडवांच्या विजयात महात्मा विदुर यांचे खूप योगदान होते.

 

विदुरनीती

 

विदुरनीतिमध्ये विदुर या विषयावर सांगतात, आपल्या जीवनात काही लोकं असेही असतात ज्यांना आपले रहस्य कधीही सांगू नयेत. कारण असे लोकं तुम्हाला पुढे चालून भविष्यात नुकसान पोहचू शकतात.

 

लोभी( लालची) व्यक्ती.

विदुरनीतिमध्ये याबद्दल साफ स्पष्ठ सांगितलेले आहे कि, लोभी व्यक्ती कोणाचाच सखा, संबंधी असू शकत नाही. म्हणूनच अशा लोभी व्यक्तींना आपल्या जीवनातील रहस्य कधीच सांगू नये. लोभी व्यक्ती तुमच्याकडून ऐकलेल्या रहस्यांना आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो. म्हणून चुकूनही लोभी व्यक्तींना आपल्या रहस्यांचा भेद देऊ नये.

 

निरर्थक बडबड करणारे व्यक्ती.

 

ज्या लोकांना व्यर्थ बडबड करण्याची सवय असते असे व्यक्ती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. ज्या लोकांना जास्त बोलण्याची सवय असते असे लोकं चारचौघात बोलतात तेंव्हा आपल्याबद्दल कमी आणि दुसऱ्यांबद्दलच जास्त बोलतात. अश्या लोकांकडून कोणीही आपले रहस्य जानुन घेऊ शकतो म्हनुनच अशा लोकांसमोर आपल्या रहस्यांबद्दल कधीच बोलू नये.

 

अतिशय चलाख व्यक्ती.

महात्मा विदुर सांगतात, जे व्यक्ती अतिशय हुशार असतात त्यांना तर कधीच आपले रहस्य सांगू नये कारण अशे व्यक्ती कोणाचेही रहस्य अतिशय आरामात ऐकतात आणि त्यांना आपल्या फायद्यासाठी वापरू शकतात. अशा लोकांना आपल्या जीवनात महत्व देण्यापूर्वी एकवेळ विचार अवश्य केला पाहिजे. चलाख लोकं आपल्या अतिशय प्रिय व्याकीचा पण आपल्या फायद्यासाठी वापर करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here