आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

ताजमहाल नंतर आता हि ऐतिहासिक इमारत मंदिर असल्याचा दावा करण्यात येतोय..

भारताला ऐतिहासिक स्मारके आणि मंदिरांचा अमुल्य असा ठेवा लाभलेला आहे. यातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तूला आपले विशेष असे महत्व इतिहासकाळातून मिळाले आहे.  आयोध्यामध्ये राम मंदिर निर्माण करण्याचा सुप्रीम कोर्टचा ऐतिहासिक निर्णयानंतर मथुरा येथील कृष्ण जन्मभूमीचा वाद सुरु आहे.

आता असाच एक वाद राजधानी दिल्लीयेथील एका ऐतिहासिक वास्तूबद्दल निर्माण झाला आहे.

ताजमहाल

new google

दिल्लीच्या साकेत न्यायालयात दिल्लीची ओळख असलेल्या कुतुबमिनारबाबत एक याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये म्हटले गेले आहे कि, कुतुबमिनार च्या जागी पूर्वी हिंदू देवी देवतांची मंदिर होती, त्यामुळे येथे पुन्हा हिंदू देवांची स्थापना करुन पूजा-अर्चना करण्यास परवानगी देण्यात यावी.

याचिकाकर्त्याने कुतुबमिनार निर्माण होण्याअगोदर त्या ठीकानी मंदिर होते आणि त्याचे पुरावे आपण देऊ शकतो असा दावा केला आहे.

याशिवाय याचीकाकर्त्यांने म्हटले आहे कि, केंद्र सरकारने मंदिरासाठी एक ट्रस्ट बनवावा आणि याची जिम्मेदारी त्या ट्रस्टकडे देण्यात यावी. कुतुबमिनारच्या जागी हिंदू देवदेवतांचे मंदिर होते, एवढेच नाही तर, जैन धर्माचे प्रार्थनास्थळ
सुद्धा याच परिसरात असल्याचे याचिकेत म्हटले गेले आहे. शेवटी न्यायलायाकडे रिती-रीवाजाने येथे मंदिर करून पूजा करण्याची परवानगी सुद्धा मागण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण..

असा दावा करण्यात आला आहे कि, कुतुबमिनार च्या जागेवर अगोदर हिंदू मंदिर होते. “बादशहा कुतुबुद्दीन एबक” याने हे मंदिर तोडून त्याठिकाणी कुतुबमिनारची निर्मिती केली होती. इतिहासकारांचे म्हणणे आहे कि, लाल कोटअसलेल्या अवशेषपासून कुतुबमिनारची निर्मिती करण्यात आली होती.

जाणून घ्या कुतुबमिनार विषयी…

ताजमहाल

इतिहासात दिल्लीच्या कुतुबमिनारला विशेष असे महत्व आहे. ७२.५ मिटर उंच असलेली हि ऐतिहासिक वास्तू, विटांपासून बनलेली जगातील सर्वांत उंच मिनार आहे. कुतुबमिनारला एकूण ३७९ पायऱ्या बनवलेल्या आहेत.
११९९ मध्ये कुतूबुद्दीन एबक याने या मिनारची निर्मिती सुरु केली होती. त्याच्या मृत्यूनंतर इल्तुतमिश याने बाकीचे निर्मिती कार्य पूर्णत्वास नेले होते. तब्बल २१ वर्षानंतर १२२० मध्ये कुतुबमिनार बनून तयार झाला होता.

कुतुबमिनार मध्ये कुतुब -उल-इस्लाम मस्जिद सुद्धा आहे जीची निर्मिती कुतूबु द्दीन एबक याने ११९८मध्ये केली होती. दावा केला जात आहे कि हि मस्जिद हिंदू मंदिरांच्या अवशेषांवर तयार करण्यात आली होती. मिनार मध्ये लोखंडी स्तंभ आहे जो ४ थ्या शताब्दी मधील आहे. अस असल तरी नंतर कुतुबमिनारच्या आस-पास तुगलक आणि लोदी वंशाच्या राजांनी सुद्धा बांधकाम आणि वास्तू निर्मिती केली होती.

एकंदरीत या न्यायलयात दाखल केल्या गेलेल्या अर्जामुळे आता पुन्हा एकदा ऐतिहासिक वास्तू वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here