आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

गेल्या वर्षी १०० मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले कोटाचे जेके लोन हॉस्पिटल परत एकदा विवादात, २४ तासात ९ मुलांचा मृत्यू.

राजस्थान मधील कोटा येथील जेके लोन हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूची हि पहिली घटना नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे हॉस्पिटल चर्चेत आले होते, जेंव्हा याठिकाणी अचानक १०० मुलांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. यामुळे आता परत एकदा कोटाचे जेके लोन हॉस्पिटल विवादात सापडले आहे.

जेके लोन

यावेळी या हॉस्पिटलमध्ये मागील २४ तासात ९ नवजात मुलांना आपला प्राण गमवाव लागला आहे. या मुलांच्या परिवारांचा असा आरोप आहे की, रुग्णालय व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे मुलांचा बळी गेला आहे.

new google

परिवारांनी जेके लोन हॉस्पिटलवर केलेल्या आरोपांचे हॉस्पिटल व्यवस्थापनाने पूर्णपणे खंडन केले आहे. याबद्दल बोलताना जेके लोन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.सी. दुलारा यांनी सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या ९ मुलांपैकी ३ मुलांना हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेतच आणले होते.

आणि दुसऱ्या ३ मुलांना जन्मजातच गंभीर आजार होता त्यामुळे ते मरण पावले तर बाकीच्या ३ मुलांच्या मेंदुमद्ये पाणी भरल्याने त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलचे व्यवस्थापन यांचा काहीही संबंध नाही. हॉस्पिटलने केलेल्या या दाव्याची चौकशी करण्यासाठी कोटा जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून या घटनेच्या चौकशीचा अहवाल मागवला आहे.

या घटनेविषयी बोलताना राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा म्हणाले, ९ नवजात मुलांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यापैकी ३ मुलांना मृत अवस्थेतच जेके लोन हॉस्पिटलमध्ये आणले होते. मुख्यमंत्री आणि सरकार या मुद्य्याला अतिशय गंभीरतेने घेत आहेत. सरकारचा पूर्ण प्रयत्न असेल, कोणत्याही कारणाने नवजात मुलांना आपले प्राण गमावण्याची वेळ येऊ नये.

जेके लोन

गेल्या वर्षी जेके लोन हॉस्पिटलमध्ये १०० मुलांचा मृत्यू.

जेके लोन हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची घटना घडण्याची हि पहिली वेळ नाही, गेल्या वर्षी याच हॉस्पिटलमध्ये रहस्यमयरित्या १०० मुलांचा नृत्यू झाला होता. १०० मुलांच्या मृत्यूनंतर अशोक गहलोत यांच्या सरकारवर सर्वत्र थू थू झाली होती. त्यावेळी पण सरकारकडून अशाच प्रकारचा (भविष्यात अशी घटना होणार नाही) दावा करण्यात आला होता.

जेके लोन हॉस्पिटलबद्दल सरकार गप्प का?

सरकार प्रत्येक वेळी अशी घटना घडल्यावर आपण याप्रती अतिशय गंभीर आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करते, परंतु काही दिवसांनंतर त्यांची गंभीरता कुठे जाते हे कळत नाही. याच गोष्ठीला आधार बनवत विरोधी सरकार गहलोत सरकारवर हल्ला करत आहे.

विपक्षी पक्षाला नाहीतर ज्यांनी मतदान करून तुम्हाला मुख्यमंत्री बनवले आहे त्या जनतेला तरी अशोक गहलोत यांनी उत्तर दिले पाहिजे, कि एकच हॉस्पिटल दरवर्षी नवजात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत का ठरत आहे?

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here