आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

स्वर्गीय पत्नीच्या स्वप्नपूर्तीसाठी या व्यक्तीने केलेले कार्य पाहून, तुम्हीही कौतुक कराल.

आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम येथील रहिवाशी इंदिरा प्रसाद गेडेला हे मागील काही दिवसांपासून गरिबांसाठी देवदूत म्हणून समोर येत आहे. या वयातही हा वृध्द व्यक्ती अगदी निस्वार्थ भावनेने गरिबांची सेवा करत आहे.

२००६ मध्ये फिजिकल दिग्दर्शक पदावरून सेवानिवृत झालेल्या इंदिरा प्रसाद गेडेला यांच्या पत्नीचे २००० मध्ये आजारपणामुळे निधन झाले. परंतु आता ते गोर गरिबांची मदत करण्यासाठी आपल्या पत्नीच्या पेंशनचा उपयोग करत तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पत्नी

new google

 

इंदिरा प्रसाद यांची पत्नी ललिता देवी ह्या एका कॉलेजात प्रोफेसर होत्या. कॉलेजमध्ये शिकवत असताना त्यांना सामाजिक कार्य करण्याची आवडही होती आणि हे काम करण्यासाठी त्या ‘श्रीकाकुलम रोटरी क्लब’ शी जुडलेल्या होत्या.

याच क्लबच्या माध्यमातून ललिता देवी समाज सेवा करत. २००० मध्ये ललिता देवी यांच्या दुखद मृत्युनंतर पती इंदिरा प्रसाद हे आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ समाज सेवेचे काम करत आहेत.

ललिता देवी ह्या सरकारी कॉलेजात प्रोफेसर पदावर होत्या आणि यामुळे त्यांना पेंशनच्या रूपाने ३०००० रुपये मिळत. आता हि रक्कम पती इंदिरा प्रसाद स्वतः न वापरता गरिबांच्या मदतीसाठी वापरतात. इंदिरा प्रसाद यांनी केलेल्या दानामुळे अनेक गरीब आणि गरजू मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे.

इंदिरा प्रसाद हे गरीब आणि गरजू मुलांची फीस भरण्यासाठी आपल्या पत्नीची पेन्शन ३०००० रुपये वापरतात. दर महिन्याला मिळणारी रक्कम ते गरिबांच्या मदतीसाठी दान करतात.

 

या मुस्लीम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी दिली चक्क 80 लाख रुपयांची जमीन दान!

 

शिक्षणाव्यतिरिक्त इंदिरा प्रसाद हे, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या गरीब मुलांच्या प्रवासाचा खर्चही भरतात. या शिवाय अनेक क्षेत्रात त्यांचे काम अतुलनीय आहे.

इंदिरा प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, दोघे अलग अलग जातीचे असतानाही त्या काळी त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांची पत्नी हि उडिया भाषेची प्रोफेसर होती. २००० मध्ये दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे निधन झाले. परंतु पत्नीच्या निधनानंतरही त्यांनी तिच्या समाज सेवेच्या कार्यात खंड पडू दिला नाही. यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here