आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

लागा तयारीला…. या तारखेला होणार ग्रामपंचायत निवडणूका..

कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतिच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर योग्य ती खबरददारी घेऊन शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका व्यवस्थित पार पाडल्यानंतर आता निवडणूक आयोगाने राज्यातील कार्यकाळ संपलेल्या 14 हजाराहून जास्त ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

ग्रामपंचायत

करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला.

 

यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या निवडणुकांमध्येही पहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवविण्याची घोषणा अलीकडेच केली आहे

असा असेल निवडणूक कार्यक्रम :

 

15/12/2020 तारखेला स्थानिक तहसीलदार निवडणूक नोटीस प्रसिद्ध करतील. तर 23/12/2020 ते 30/12/2020 या काळामध्ये नामनिर्देशित अर्ज सादर करण्यात येतील.

31/12/2020 हा अर्ज छाननी करण्याचा दिवस असेल.

तर उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 04/01/2021 हा असेल. तर याच दिवशी दुपारी 3 नंतर अंतिम निवडणूक उमेदवाराची यादी आणि त्यांच्या निवडणूक चिन्हांची घोषणा केली जाईल.

तर 15/1/2021ला प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल.
मतमोजणीचा दिनांक. 18/01/2021 असणार आहे.

हा सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन करून राबवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here