आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या कारणांमुळे शरद पवार यांना भारताचे भावी पंतप्रधान मानल्या जात आहे..! वाचा सविस्तर…

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव आहे. शरद गोविंदराव पवार हे एक ज्येष्ठ भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक, अध्यक्ष आहेत. तीन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवणारे आणि प्रभावशाली नेते म्हणून आपली ओळख निर्माण करणारे शरद पवार हे केंद्र सरकारमध्ये संरक्षण व कृषिमंत्रीही राहिले आहेत.

शरद पवार हे १९९९ पर्यंत कॉंग्रेस पक्षातच होते परंतु पक्षांतर्गत झालेल्या मतभेदामुळे त्यांनी १९९९ मध्ये स्वतःचा नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. शरद पवार हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत आणि पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. भारतीय राजकारणात आणि महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांची चांगलीच पकड आहे.

शरद पवार यांचे सुरुवाती जीवन.

शरद पवार

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला होता. वडील गोविंदराव पवार हे बारामतीच्या कृषक सहकारी संघात कार्यरत होते. त्यांची आई शारदाबाई ह्या त्यांच्या फार्मची देखरेख करत. शरद पवार यांनी पुणे विश्वविद्यालयात येणाऱ्या सम्बद्ध ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ़ कॉमर्स (BMCC) येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

शरद पवार यांचा विवाह प्रतिभा शिंदे यांच्याशी झाला होता. त्यांची सुपुत्री सुप्रिया सुळे ह्या पण महाराष्ट्रातील राजकारणात अत्यंत प्रभावशाली आहेत. शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवार हे सुद्धा महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद पण भूषवलेले आहे. शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रताप पवार हे मराठी भाषेतील लोकप्रिय दैनिक सकाळचे संचालन करतात.

राजकारणातील गुरु.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार हे आपले राजकीय गुरु मानतात. १९६७ मध्ये सर्वप्रथम शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर बारामती विधानसभेवर विजय मिळवला होता. १९७८ मध्ये पवारांनी कॉंग्रेस पार्टी सोडून जनता पार्टीसोबत मिळून महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले. परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर इंदिरा गांधी सरकारने महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून टाकले.

शरद पवार यांच्या जीवनातील प्रथम निवडणूक.

१९८० च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते आणि ए.आर.अंतुले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार बनले. १९८३ मध्ये शरद पवार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (समाजवादी) चे अध्यक्ष बनले आणि आपल्या जीवनात सर्वप्रथम बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.

१९८५ मध्ये झालेली विधानसभेची निवडणुकही त्यांनी प्रचंड मतांनी जिंकली आणि राज्याच्या राजकारणात लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकसभेच्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला (समाजवादी) 288 पैकी 54 जागा मिळाल्या आणि शरद पवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून निवडण्यात आले.

शरद पवार

शरद पवार यांची कॉंग्रेस पक्षात वापसी.

१९८७ मध्ये शरद पवार हे कॉंग्रेस पक्षात परतले. जून १९८८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चौहान यांना केंद्रीय अर्थमंत्री केले, आणि शरद पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री केले गेले. त्यानंतर झालेल्या १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागा जिंकल्या.

१९९०मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पवार यांनी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार टक्कर दिली ती शिवसेना आणि भाजपच्या युतीने, कॉंग्रेसने २८८ जागांपैकी १४१ जागांवर विजय मिळवला, परंतु त्यांना बहुमत मिळवता आले नाही. पवारांनी १३ अपक्ष आमदारांच्या पाठींब्याने सरकार बनवले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.

शरद पवार यांना भावी पंतप्रधान म्हणून बघितल्या जाऊ लागले.

१९९१ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर पंतप्रधान पदासाठी नरसिम्हा राव आणि एन. डी. तिवारी यांच्यासह शरद पवार यांचेही नाव समोर येऊ लागले. परंतु कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाने नरसिंह राव यांना पंतप्रधान म्हणून निवडले आणि शरद पवार यांना संरक्षणमंत्री केले गेले.

१९९३ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यामुळे शरद पवार हे परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. शरद पवार यांनी ६ मार्च १९९३ रोजी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली आणि त्याच्या काही दिवसानंतरच १२ मार्चला महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये शेकडो निरपराध लोकांचा बळी गेला होता.

 

शरद पवार

शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप.

१९९३ नंतर शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले. ब्रहन्मुम्बई महानगर पालिकेचे उपायुक्त जी.आर.खैरनार यांनी पवारांवर भ्रष्टाचार आणि आरोपींना वाचवण्याचे गंभीर आरोप केले.
याचवेळी अन्ना हजारे यांनी महाराष्ट्रातील वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी केली आणि त्यासाठी उपोषण केले. या सर्व घटनांनी पवारांच्या राजकीय प्रतिमेला हानी पोहचली होती.

शिवसेना भाजपची युती.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना बी.जे.पी. युतीने एकूण 138 जागा जिंकल्या तर कॉंग्रेस पक्षाला केवळ 80 जागा जिंकता आल्या यामुळे शरद पवार यांना राजीनामा द्यावा लागला आणि मनोहर जोशी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार हे विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते.

लागलीच लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या पदाचा राजीनामा दिला होता. १९९८ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाने आणि त्याच्या मित्रपक्षांनी महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ३७ जागा जिंकल्या. यावेळी शरद पवार हे बाराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले.

१२ वी लोकसभा विसर्जित.

१९९९ मध्ये जेव्हा १२ वी लोकसभा विसर्जित केली गेली आणि परत निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा शरद पवार, तारिक अन्वर आणि पी.ए. संगमा यांनी कॉंग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा भारतात जन्मलेलाच असायला हवा असा आवाज उठवला. तानंतर काही दिवसांनीच ह्या तिघांनी कॉंग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रितपणे सरकार स्थापन केले. २००४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर शरद पवार यूपीए च्या युती सरकारमध्ये सामील झाले, यावेळी शरद पवारांना कृषी मंत्री बनवण्यात आले. २०१२ मध्ये शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली, जेणेकरून युवा आणि नवीन लोकांना संधी मिळावी.

 

शरद पवार

खेळांप्रती खास आवड.

राजकारानासोबत शरद पवार यांना क्रिकेटची खूप आवड आहे. २००५ ते २००८ या काळात ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही होते. २००१ ते २०१० या काळात ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि जून २०१५ मध्ये पुन्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

शरद पवार यांनी अनेक संस्थांची पदे भूषवली आहेत.

पवारांना कब्बडी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या अनेक खेळांमध्ये त्यांना रुची आहे, या खेळांसंबंधित अनेक संस्थांसोबत शरद पवार हे जुडलेले आहेत. मुंबई क्रिकेट एसोसिएशन, महाराष्ट्र कुश्ती एसोसिएशन, महाराष्ट्र कबड्डी एसोसिएशन, महाराष्ट्र खो-खो एसोसिएशन, महाराष्ट्र ओलंपिक्स एसोसिएशन, भारतीय क्रिकेट कण्ट्रोल बोर्ड, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद् उपाध्यक्ष, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद् अध्यक्ष हे सर्व पदे त्यांनी भूषवली आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here