आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

The Dirty Picture चित्रपटात विद्या बालन सोबत काम केलेल्या अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.!

गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपट कलाकारांनी ह्या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे त्यातच आता , ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटात विद्या बालन सोबत काम केलेली अभिनेत्री आर्या बनर्जीचे दुखद निधन झाले आहे.

३३ वर्षीय अभिनेत्रीचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीत तिच्या कोलकता येथील राहत्या घरामध्ये आढळून आला आहे. आर्य बॅनर्जीचे खरे नाव देवदत्ता बॅनर्जी होते आणि ती प्रसिद्ध सितार वादक निखिल बॅनर्जी यांची सर्वात लहान मुलगी होती.

 

आर्या बॅनर्जी

रक्ताने माखलेला मृतदेह.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, कोलकत्ता पोलीस जेव्हा घटनास्थळावर पोहच तेंव्हा त्यांना अभिनेत्री आर्या बॅनर्जी (Arya Banerjee)चा मृतदेह रक्ताने माखलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी तिच्या घरामध्ये दरवाजा तोडून प्रवेश केला आणि समोर हे भयावह दृश्य त्यांना पाहण्यास मिळाले.

घटना स्थळाचा तपास करताना पोलिसांना आढळून आले कि, अभिनेत्री आर्या बॅनर्जी(Arya Banerjee)च्या नाकाद्वारे रक्त येत होते तसेच तिने बेडरूममध्ये रक्ताची उलटी केल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेबद्दल पोलिसांना अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या मेड ने सूचना दिली होती.

घरात काम करणाऱ्या मेडच्या बयानानुसार, जेंव्हा ती कामासाठी अभिनेत्रीच्या घरी आली तिला घराचा दरवाजा बंद आढळून आला, तिने अनेक वेळा अर्याला फोनही लावला परंतु कित्तेकदा फोन करूनही उचलत नसल्याने तिने पोलिसांना सूचना दिली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत कारण त्यांच्यामते हे काही दुसरेच प्रकरण असू शकते.

आर्या बॅनर्जी

 

पोलिसांनी आर्या बॅनर्जीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. त्यांच्यामाहितीनुसार आर्या हि बर्‍याच दिवसांपासून फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरुन जेवण मागवत होती. तिच्यासोबत एक पाळीव कुत्रा राहत होता. बाहेर जास्त लोकांना ती जास्त भेटत नसे. पोलीस सध्या कॉल डीटेल्स आणि बाकी संशयास्पद गोष्टींचा तपास करत आहेत.

आर्या बॅनर्जीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ”लव सेक्स और धोखा’ या चित्रपटाने केली होती. त्यानंतर तिने प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालनबरोबर द डर्टी पिक्चर या चित्रपटात काम केले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here