आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

बंगालचे राजकारण तापलेले असताना, संघप्रमुख मोहन भागवत यांचा २ दिवसीय दौरा कितपत योग्य?

सध्या पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले आहे. केंद्र सरकार आणि ममता बनर्जी यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षांदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आजपासून बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बंगालमधील त्यांच्या संघातील काही महत्वाच्या लोकांशी बैठका घेणार आहेत. भाजपचे पक्षप्रमुख जेपी नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा हा दौरा कितपत योग्य आहे असा सर्वांना प्रश्न पडला आहे.

गुरुवारी सकाळी जेपी नड्डा हे त्यांच्या ताफ्यासह पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डायमंड हार्बरला जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता.

 

बंगाल

 

या हल्ल्यामाद्ये भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक स्थानिक नेते गंभीर जखमी झाले आहेत. बंगाल पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यासंबंधित ७ जनांना अटक करण्यात आली आहे आणि आतापर्यंत या प्रकरणात ३ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

बंगाल पोलिसांनी दगडफेकीसाठी अज्ञात लोकांवर आरोपपत्र दाखल केले आहे. याव्यतिरिक्त एक आरोपपत्र भाजपचे नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही दाखल केले आहे. राकेश सिंह यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे. बंगाल पोलिसांच्या नुसार जेपी नड्डा यांच्या ताफ्याला Z प्लस सुरक्षा देण्यात आली होती याशिवाय बंगाल पोलिसांची अतिरिक्त सुरक्षाही सोबत होती.

जेपी नड्डा यांच्या ताफ्यासह आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी ४ एडिशनल SP, ८ डिप्टी SP, ८ इंस्पेक्टर, ३० अधिकारी, ४० RAF, १४५ कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. डायमंड हार्बर येथे जाताना जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती, ज्यामध्ये जेपी नड्डा हे तर सुरक्षित राहिले परंतु भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक जन जखमी झाले आहेत.

 

बंगाल

 

जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी चौकशीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना समन्स बजावले आहेत. हे दोन्हो अधिकारी कोणत्याही चौकशीसाठी दिल्लीला जाणार नाहीत अशी माहिती पश्चिम बंगाल सरकारने दिली आहे. यामुळे हा संघर्ष आणखीच वाढणार असे दिसत आहे.

बंगालच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृहसचिवांना एक पत्र लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे कि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना १० डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहण्यास सूट देण्यात यावी कारण १० डिसेंबरच्या घटनेसंबंधात सध्या राज्य सरकारकडून कारवाई सुरु आहे. जे पी नड्डा यांना पूर्ण सुरक्षा देण्यात आली होती, असेहि त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

बंगालचे राजकारण तापलेले असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आजपासून बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत हि एक चिंताजनक बाब आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here