आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या आरोग्याची खास काळजी घेतली पाहिजे, हि समस्या उद्भवू शकते!

१३ डिसेंबर २०२० रोजी अघ्न महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. आज सूर्योदय अनुराधा नक्षत्रात होणार आहे आणि तो पूर्ण दिवसभर याच नक्षत्रात राहणार आहे. रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग या दिवशी बनत आहे. शनिवारी रात्रीच चंद्राने तुळ राशी बदलून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला आहे.

या राशीमध्ये अगोदरच सूर्य, बुध, शुक्र आणि केतू हे चार ग्रह एकत्र आहेत. यामुळे आज एकाच राशीमध्ये ५ ग्रह आल्यामुळे पंचग्रही योग बनत आहे. या पंचग्रही योगाचा परिणाम सर्वच राशींवर वेगवेगळा पडणार आहे, आजचा तुमचा दिवस कसा राहील हे वाचा सविस्तर…

राशी

new google

 

मेष.

मेष राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या कार्यालयामध्ये खूप प्रसंशा मिळणार आहे. आपल्या परिवारासोबत आजचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे जाईल. गरज पडल्यास लोक तुमची मदतही करतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, घाईघाईने कोणतीही चूक करू नये. संपती संबंधित वाद वाढू शकतात. या सर्वांपासून बचावासाठी सूर्याला जल अर्पण करावे आणि सूर्याचा मंत्र जप करावा.

वृषभ.

वृषभ राशीच्या व्यक्तींना आज परत कामासाठी संधी मिळणार आहे. व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. परीवारामध्ये आज आनंदाचे वातावरण राहील. आजच्या दिवशी कोणालाही, न मागता आपला सल्ला देऊ नये. आरोग्याच्या दृष्ठीने रक्त संबंधित आजार डोकाऊ शकतात. विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. आज मंदिरात दिवा पेटवण्यासाठी शुध्द तूप अर्पण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

मिथुन.

व्यवसायात तुम्ही बनवलेली प्लानिंग सफल होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या संतानाकडून आनंद मिळेल. पैश्यांच्या बाबतीत चार चौघांशी सल्ला मसलत करूनच पुढील निर्णय घ्यावा. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. एखादे जुने दुखणे परत वाढू शकते. याचा उपाय म्हणून हनुमान चालीसाचे वाचन आणि मनन करावे.

कर्क.

व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. अचानक धनलाभ आणि संतान सुख मिळणार आहे. पैसे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. महत्वाच्या लोकांशी बोलणे होऊ शकते. प्रेमींसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार नाही काही प्रेमींचे संबंध तुटू शकतात. लाव लाईफ मध्ये अनेक समस्या झेलाव्या लागणार आहेत. आज श्रीगणेशाला दुर्वा वहावी.

सिंह.

आज तुम्हाला सामाजिक कार्यात मान सन्मान मिळणार आहे. अनेक दिवसांपासून थांबलेले कामे मार्गी लागणार आहेत. तुमच्या परिवारातील सर्वच सदस्यांची सहायता मिळणार आहे. डोळे मिटून कोणावरही विश्वास करू नये. एखादी महागडी वस्तू चोरी होऊ शकते म्हणून विशेष काळजी घ्यावी. या सर्वाला उपाय म्हणून गरिबांना वस्त्र दान करावे.

 

राशी

कन्या.

आपण अनेक दिवसांपासून बघत असलेली कामे आज पूर्ण होतील. तुमच्या समयसूचकतेने जुने वाद मिटवून घ्यावेत. अपेक्षेपेक्षा जास्त नफा होणार आहे. मारुतीच्या मंदिरात आज लाल रंगाचा झेंडा अर्पण करावा.

तुळ.

अविवाहित मुलांसाठी आज्ज स्थळ येणाची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. एखादी जुनी योजना आज सफल होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यासाठी घाई करू नये. भगवान शंकराच्या पिंडीवर बेल पत्र वाहावे.

वृश्चिक.

आपले तेज आपल्या कृतीतून दाखवून द्या. नोकरीच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक वार्ता मिळू शकतील. कौटुंबिक पातळीवर बोलण्यात तारतम्य ठेवावे. संयम, सामंजस्याने परिस्थिती हाताळावी. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग. मान, सन्मान वृद्धिंगत होईल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढू शकेल.

धनु.

धनु राशीच्या व्यक्तींना मोठा धनलाभ होण्याचे योग बनत आहेत. आज या राशीच्या व्यक्तींना त्यांचे आवडीचे भोजन मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पण आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. विनाकारण राग राग करू नये, आज तुमच्या वडिलाच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि शानिदेवांचा मंत्र जप करावा.

 

राशी

मकर.

आज तुम्हाला दुसऱ्यांची मदत करण्याचे योग बनत आहेत. पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास फायदा होईल. परिवाराशी संबंध चांगला राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार नाही. आज दिवसभर डोकेदूखीची समस्या राहणार आहे. आजच्या दिवशी विवाहित महिलांना सुहागनीचे साहित्य भेट म्हणून द्यावे.

कुंभ.

आज तुमचे बिघडलेले कामही मित्रांच्या मदतीने पूर्ण होणार आहे. परिवारातील बुजुर्गांच्या सल्ल्याने अनेक समस्यांचे समाधान निघेल. खर्च जरा जास्त होणार आहे, शेजार्यांशी वादविवाद करणे टाळावे. आरोग्याची समस्या राहणारच आहे यासाठी उपाय म्हणून वृध्द महिलेला कपडे दान करावेत.

मीन.

मीन राशीच्या लोकांचा आज यात्रा करण्याचा आणि धन लाभ होण्याचे योग बनत आहेत. व्यवसायात पार्टनर ची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या जीवनसंगिनी सोबत तुमचा वाद होऊ शकतो म्हणून सावध राहिलेलं बर. आपण बोलत असलेल्या शब्दांवर लक्ष द्यावे, जेणेकरून कोणाचेही मन दुखणार नाही. मंदिरात किंवा अन्य ठिकाणी अन्न दान करावे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here