आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

अर्नब गोस्वामीच्या रिपब्लिक टीवी (Republic TV) न्यूज चॅनलला आणखी एक धक्का, CEO विकास खानचंदानीला अटक.

 

गेल्या काही दिवसांपासून अर्नब गोस्वामी आणि त्याचे न्यूज चॅनल रिपब्लिक टीवी (Republic TV) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अर्नब गोस्वामीला काही दिवसांपूर्वीच कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या संकटात आता आणखीच भर पडली आहे कारण, आता रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी यांना टीआरपी रिग्जिंग घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आज सकाळी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या CRIME BRANCH ने अटक केली. टीआरपी रिग्जिंग घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत १३ लोकांना अटक करण्यात आली आहे.

हंसा रिसर्चचे अधिकारी नितीन देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला होता. मुंबई पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये स्थानिक न्यायालयात टीआरपी
घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

अर्नब गोस्वामी

पोलिस क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) हि टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याचा तपास करीत आहे. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या वितरण प्रमुखांसह १२ जणांना यापूर्वी गुन्हे शाखेने अटक केली आहे.

बनावट टीआरपी घोटाळा तेंव्हा समोर आला जेंव्हा, गेल्या महिन्यात ‘ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल’ (बीएआरसी) रेटिंग एजन्सीने ‘हंस रिसर्च ग्रुप’ च्या माध्यमातून काही टेलिव्हिजन वाहिन्यांनी टीआरपी डेटामध्ये हेरफेर केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

‘व्ह्यूअरशिप डेटा’ म्हणजे किती दर्शक कोणते चॅनेल पहात आहेत आणि किती वेळासाठी पहात आहेत हे रेकॉर्ड करण्यासाठी जबाबदारी हंसा रिसर्च ग्रुपला देण्यात आली होती.

अर्नब गोस्वामी

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही रेटिंग घोटाळा प्रकरणाची तपासणी करत असताना काही दर्शकांनी कबुल केले होते कि, त्यांना रिपब्लिक टीव्ही चॅनल पाहत नसले तरीही केवळ चालू ठेवण्यासाठी पैसे दिले गेले होते.

दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीने स्वत: त्यांच्यावरील हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. टीआरपी घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन स्थानिक चॅनलचेही नाव समोर आले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here