आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

उल्कापिंडांचा वर्षाव भारतात या ठिकानी दिसणार आहे….

आज रात्री देशभरात आकाश हे बदललेले दिसणार आहे. (Meteoroid)उल्कापिंडांच्या वर्षावाने आकाश जगमगून निघणार आहे. उल्कापिंडाचा वर्षाव हि एक खास खगोलीय घटना आहे. आज रात्री हि घटना तिच्या शिखरावर पोहोचणार आहे. नासाच्या अहवालानुसार यादरम्यान प्रती तास १२० जेमिनोइड उल्कापिंड पडताना दिसणार आहेत.

उल्कापिंड

 

आपण उल्कापिंड पडताना कसे पाहू शकता.

एम.पी. बिर्ला प्लॅनेटेरियमचे संचालक आणि प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ देवीप्रसाद दुवारी यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले, जेमिनाड (Geminid) म्हणून ओळखल्या जाणारी उल्कापिंडांची वर्षाव यावर्षीची सर्वात मोठी घटना आहे. आज होणाऱ्या उल्कापिंडाच्या वर्षावाची विशेषतः हि आहे कि, या घटनेला कोणत्याही दुर्बिणीशिवाय कोणीही बघू शकतो.

भारतात कधी दिसणार हि उल्कापिंडाची घटना.

आकाश साफ असल्यास हि घटना संपूर्ण देशात दिसणार आहे. देवीप्रसाद दुवारी यांच्यानुसार, रात्री १ ते २ वाजे दरम्यान तासाला १५० उल्कापिंड पडताना दिसतील. रात्री ९ ते १० च्या दरम्यानही हि घटना काही ठिकाणी दिसणार आहे. या घटनेला पाहण्यासाठी कोणत्याही खगोलीय उपकरणांची आवशकता नाही त्यामुळे कोणीही सहजपणे या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो.

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, १८ व्या दशकाच्या सुरुवातीस जेमिनाड उल्कांचा वर्षाव पाहण्यात आला होता. त्यावेळी पडणाऱ्या उल्कापिंडांचा वर्षाव हा विरळ होता. दर तासाला केवळ १० ते १५ उल्काच पडताना दिसायच्या. आज आपणास १२० उल्का दर तासाला पडताना दिसतील. जेमिनाड उल्का ह्या चमकदार आणि पिवळ्या रंगांच्या असतात म्हणून रात्रीच्या वेळी त्यांना स्पष्ठपने बघितले जाऊ शकते.

 

उल्कापिंड

उल्कापिंडांचा वर्षाव होण्याचे कारण.

दरवर्षी ठराविक वेळेला आकाशात एका पाठोपाठ अनेक उल्का पिंड जमिनीकडे येताना दिसतात याच घटनेला खगोल शास्त्रात उल्कापिंडांचा वर्षाव म्हणले जाते. जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असलेल्या वेगवेगळ्या उल्का तार्‍यांच्या जवळून जाते तेंव्हा हि घटना घडते. उल्का पिंड चमकदार प्रकाशाचे तेजस्वी पट्टे असतात, जे बहुधा रात्रीच्या आकाशात दिसू शकतात.

खगोलशास्त्रज्ञ देवीप्रसाद दुआरी यांच्यानुसार, जेव्हा धुळीच्या कणाच्या आकाराची लहान दगडासारखी वस्तू पृथ्वीच्या वातावरणात अत्यंत वेगाने प्रवेश करते, तेव्हा घर्षण आणि प्रकाशाची एक सुंदर सरी बनवते. हि घटना रात्रीला होत असल्याने ती आपण स्पष्ठपणे पाहू शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here